Home धार्मिक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सनातन धर्माचा अपमान करून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हे दाखल करा ! – डॉ. मानसिंग शिंदे, 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सनातन धर्माचा अपमान करून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हे दाखल करा ! – डॉ. मानसिंग शिंदे, 

8 second read
0
0
94

no images were found

 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सनातन धर्माचा अपमान करून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हे दाखल करा ! – डॉ. मानसिंग शिंदे, 

 

कोल्हापूर(प्रतिनिधी ):- काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि माजी राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अलीकडेच अनेक वृत्तवाहिन्यांवर भगवा आतंकवाद न म्हणता, ‘‘सनातनी आतंकवाद म्हणा’’ किंवा ‘‘हिंदुत्ववादी आतंकवाद म्हणा’’ अशी अत्यंत आक्षेपार्ह, चिथावणीखोर आणि धार्मिक द्वेष पसरवणारी विधाने केली आहेत. एकूणच पृथ्वीराज चव्हाण यांची अत्यंत आक्षेपार्ह, चिथावणीखोर आणि धार्मिक द्वेष पसरवणारी विधाने समाजासाठी धोकादायक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 194 ; कलम 195 ; कलम 356(2); कलम 354(1)(मानहानी); कलम 111 व 113 ; कलम 61  अंतर्गत गुन्हा नोंदण्यात यावा,  अशी मागणी सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे यांनी केली. ते कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सनातन संस्थेच्या वतीने झालेल्या आंदोलनात बोलत होते. आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी निवेदन स्वीकारले. 

या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, चिकोडी जिल्हा (कर्नाटक) येथील श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. अमोल चेंडके, हिंदू युवा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. अशोक देसाई, हिंदू महासभेचे जिल्हाउपाध्यक्ष श्री. विकास जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, कु. प्रतिभा तावरे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी ओम काली स्वराज्य सेनेचे अध्यक्ष श्री. विशाल पाटील, सेवाव्रत प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. संभाजी (बंडा) साळुंखे, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. अशोक रामचंदानी, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, हिंदू महासभेचे श्री. मनोहर सोरप, श्री. नंदकुमार घोरपडे, उद्योजक श्री. प्रसन्न शिंदे,  हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री मनोजकुमार चौगुले, दिलीप दळवी, रामभाऊ मेथे, कैलास दीक्षित, तालुकाध्यक्ष श्री. श्रीनिवास चव्हाण, भाजपचे किसान सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. राजेश पाटील यांसह १३० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

वर्ष २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटानंतर काँग्रेस नेत्यांनी भगवा आतंकवाद ही संकल्पना पद्धतशीरपणे प्रचारित केली. जर २०२५ मध्ये भगवा छत्रपती शिवरायांचा आहे, तर २००८ मध्ये नव्हता का? त्या वेळी पी. चिदंबरम, दिग्विजयसिंह, सुशीलकुमार शिंदे यांनी हा शब्दप्रयोग केला असताना, श्री. चव्हाण यांनी विरोध नोंदवला नाही, म्हणजेच त्यांची मूकसंमतीच होती, तसेच २०१३ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात तपास सुरू होण्याआधीच या हत्येमागे गोडसेवादी विचारसरणीचे लोक आहेत असे विधान करून तपासाची दिशा ठरवली. या प्रकरणात अटक झालेल्या सनातन संस्थेच्या निष्पाप साधकांना मे २०२४ मध्ये न्यायालयाने निर्दोष मुक्त केले; परंतु चुकीच्या विधानांमुळे त्यांनी अनेक वर्षे तुरुंगवास भोगला. मा. न्यायालयाने सर्वच्या सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करत निकालपत्रात ‘‘तत्कालीन काँग्रेस सरकारने सनातन संस्थेला जाणीवपूर्वक गोवण्याचा प्रयत्न केला’’, असे कडक ताशेरे ओढले होते. पृथ्वीराज चव्हाण  एकीकडे सोयीस्करपणे ‘‘दहशतवादाला धर्म नसतो’’ असे म्हणतात, दुसरीकडे ‘‘सनातनी दहशतवाद’’ असे म्हणतात. यातून त्यांचा दुतोंडी व दुटप्पीपणा समोर येतो. अन्य धर्मियांनी केलेल्या आतंकवादी कारवायांविषयी काही न बोलता पृथ्वीराज चव्हाण शब्द बदलून वारंवार हिंदू धर्मियांनाच दहशतवादी ठरवत आहेत.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…