Home मनोरंजन स्वातंत्र्य दिनाच्या संदर्भात सोनी सबचे कलाकार सांगत आहेत स्वातंत्र्य भावना म्हणजे नक्की काय

स्वातंत्र्य दिनाच्या संदर्भात सोनी सबचे कलाकार सांगत आहेत स्वातंत्र्य भावना म्हणजे नक्की काय

6 second read
0
0
85

no images were found

स्वातंत्र्य दिनाच्या संदर्भात सोनी सबचे कलाकार सांगत आहेत स्वातंत्र्य भावना म्हणजे नक्की काय

 

भारत आपला 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे, अशा वेळी सोनी सबचे लोकप्रिय कलाकार सांगत आहेत, या दिवसाचे त्यांच्या लेखी काय महत्त्व आहे. लहानपणीच्या आठवणींपासून ते हृदयपूर्वक वाहिलेल्या आदरांजलीपर्यंत देशभक्तीच्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना आजही पडद्यावर आणि पडद्याच्या मागे कशी प्रेरणा मिळते हे त्यांच्याकडून ऐकू या. हे कलाकार भारतीय असल्याचा अभिमान मिरवत सांगत आहेत त्यांच्या दृष्टीने खरे स्वातंत्र्य कोणते…

 

‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत शौर्य सिन्हाची भूमिका करणारा अभिषेक वर्मा म्हणतो, “या स्वतंत्र देशात आपल्याला मुक्तपणे जगता यावे यासाठी स्वातंत्र्य वीरांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. माझ्यासाठी, स्वातंत्र्य म्हणजे मानाने जगण्याची मुभा, न घाबरता कोणतीही निवड करण्याची मुभा आणि एकमेकांच्या वैयक्तिकतेचा आदर करणे. मी जेव्हा जेव्हा आपला तिरंगा उंच आकाशात फडकताना पाहतो, तेव्हा माझे मन अभिमानाने आणि कृतज्ञतेने भरून जाते. आज देशात असलेली शांती आणि आपल्या समोर असणाऱ्या संधी यांचे मोल आपण जाणले पाहिजे ही जाणीव स्वातंत्र्य दिन देतो.”

 

पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत पुष्पाची भूमिका करणारी करुणा पांडे म्हणते, “हा दिवस माझे हृदय अभिमानाने भरून टाकतो. माझ्या मते, स्वातंत्र्य म्हणजे, मोठी स्वप्नं बघण्याचा आणि ती साकार करण्यासाठी अमर्याद प्रयत्न करण्याचा अधिकार. या अधिकाराबरोबरच एक नागरिक म्हणून जबाबदारी उचलून समाजासाठी योगदान देण्याचे कर्तव्य देखील पार पाडले पाहिजे. स्वातंत्र्य दिन मला स्मरण देतो की, समजूतदारपणाने केलेले काम आणि एकता यामुळे आपला देश महान ठरतो.”

 

वीर हनुमान’ मालिकेत भगवान शिवाची भूमिका करणारा तरुण खन्ना म्हणतो, “मी अनेकदा पडद्यावर भारतीय पौराणिक पात्रे, योद्धे आणि राजे यांच्या भूमिका केल्या असल्यामुळे या देशाच्या इतिहासाशी माझे घट्ट नाते आहे. पण, आपले स्वातंत्र्य सैनिक हे आपले खरे नायक आहेत. या स्वातंत्र्य दिनी, चला, आपल्या इतिहासाला मानवंदना देऊ या आणि भविष्यासाठी असे काही काम करू या, ज्यामुळे पुढच्या पिढीला आपला अभिमान वाटेल.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…