Home राजकीय षडयंत्र रचून हिंदूंना ‘दहशतवादी’ ठरवणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – कोल्हापुरात हिंदुत्वनिष्ठांची आंदोलनाद्वारे जोरदार मागणी 

षडयंत्र रचून हिंदूंना ‘दहशतवादी’ ठरवणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – कोल्हापुरात हिंदुत्वनिष्ठांची आंदोलनाद्वारे जोरदार मागणी 

28 second read
0
0
145

no images were found

 

षडयंत्र रचून हिंदूंना ‘दहशतवादी’ ठरवणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – कोल्हापुरात हिंदुत्वनिष्ठांची आंदोलनाद्वारे जोरदार मागणी 

 

कोल्हापूर(प्रतिनिधी ):- मालेगाव स्फोटप्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष ठरल्यामुळे ‘हिंदू आतंकवाद’ ही संकल्पना काँग्रेसने रचलेले एक राजकीय षड्यंत्र होते, हे आता उघड झाले आहे. राष्ट्रनिष्ठ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर यांच्यासह इतरांना हिंदू असल्यामुळे अकारण तुरुंगात डांबण्यात आले. त्यांच्या मानसिक आणि शारीरिक छळाच्या माध्यमातून केवळ त्यांच्या नव्हे, तर अखंड हिंदू समाजाच्या प्रतिष्ठेवर घाला घालण्याचा डाव होता. त्यामुळे या षड्यंत्रातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने २ ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. 

    या वेळी सेवाव्रत प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. संभाजी(बंडा) साळुंखे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. सुनील सामंत, हिंदू एकता आंदोलनाचे श्री. दिलीप भिवटे, हिंदु युवा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. अशोक देसाई, वीर शिवा काशीद यांचे वंशज श्री. आनंदराव काशीद, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. 

     सत्य बाहेर आले; पण न्याय अजून अपूर्ण ! – शिवानंद स्वामी, हिंदु जनजागृती समिती

या प्रकरणात तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘हिंदू आतंकवाद’ हा शब्द वापरल्याचे कबूल केले; मात्र त्यांनी तो कोणाच्या सांगण्यावरून वापरला, हे त्यांनी कधी सांगितले नाही. या खोट्या नॅरेटिव्हमागे कोणत्या शक्ती होत्या, त्यांचा शोध घेऊन त्या सूत्रधारांवर कारवाई झाली पाहिजे. केवळ निर्दोषांची सुटका म्हणजे न्याय पूर्णत्वास गेल्याचे निदर्शक नाही. ज्यांनी हा खोटा तपास घडवून आणला, तेच खरे दोषी आहेत.

तपास संस्थांचा दुरुपयोग करणार्‍या जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करा!

    या प्रकरणात तपास यंत्रणांनी पूर्वग्रहदूषित भूमिका घेतली. विशेषतः तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्यासारख्या अधिकार्यांनी राजकीय दबावाखाली खोटे पुरावे तयार करून निर्दोष हिंदूंना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस सरकारच्या काळात हे अपप्रचाराचे तंत्र ठरवून राबवण्यात आले. त्यामुळे हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवण्याचा पाप केलेल्या सर्व दोषींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी ठाम मागणी या वेळी करण्यात आली.

      उपस्थित मान्यवर – अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासने, जिल्हा उपाध्यक्ष श्री. विकास जाधव, उपशहराध्यक्ष श्री. प्रशांत पाटील, अंबाबाई भक्त समितीचे श्री. प्रमोद सावंत, विश्‍व हिंदु परिषदेचे सर्वश्री अशोक रामचंदानी, विजय पाटील, सतीश मांगले, प्रकाश मेटकरी, दिलीप कुलकर्णी, सचिन भोसले, भाजपचे सर्वश्री सागर रांगोळे, सचिन कुलकर्णी, महेश चौगुले, मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, महाराज प्रतिष्ठानचे श्री. निरंजन शिंदे, हिंदु महासभेचे श्री. नंदकुमार घोरपडे, श्री. राजेंद्र तोरस्कर, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे श्री. शरद माळी, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. आदित्य शास्त्री, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री रामभाऊ मेथे, सचिन भोसले, नितीन काकडे, मनोजकुमार चौगुले.

                       

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…