no images were found
पंधरा वर्षाखालील मुला-मुलींची निवड बुद्धिबळ स्पर्धा शनिवारी कोल्हापूरात
कोल्हापूर (प्रतिनिधी ):- चेस असोसिएशन कोल्हापूरने कोल्हापूर जिल्हा सब-ज्युनिअर (पंधरा वर्षाखालील) मुला-मुलींची निवड बुद्धिबळ स्पर्धा शनिवार दि. 2 ऑगस्ट रोजी आयोजित केली आहे..
अयोध्या टॉवर (पाचव्या मजल्यावरील हॉल), दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर येथे या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने आंतरराष्ट्रीय जलद बुद्धिबळाच्या नियमानुसार होणार आहेत.शनिवारी दुपारी एक वाजता या स्पर्धेचे उद्घाटन झाल्यावर स्पर्धेच्या पहिल्या फेरीस प्रारंभ होईल. या स्पर्धेसाठी 1/1/2010 ला किंवा त्यानंतर जन्मलेल्या फक्त कोल्हापूर जिल्हातील मुलामुलीं ना स्पर्धेत भाग घेता येईल.
या निवड स्पर्धेतून चार मुले व चार मुलींची निवड 15 ते 17 ऑगस्ट 2025 दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सबज्युनिअर (पंधरा वर्षाखालील) मुलामुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे़.
दोन्ही स्पर्धेतील मुले आणि मुली गटातील विजेत्या निवड झालेल्या खेळाडूस रोख बक्षीसे व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. मुले-मुली प्रत्येक गटात विजेत्यास एक हजार रुपये व चषक उपविजेत्यास सातशे रुपये व चषक तृतीय क्रमांक पाचशे रुपये व चषक चौथ्या क्रमांक तीनशे रुपये व चषक असे एकूण रोख पाच हजार रुपये व चषक बक्षिसे म्हणून ठेवले आहे
याव्यतिरिक्त 7, 9 व 11 वर्षाखालील मुलांना व मुलींना प्रत्येक गटात दोन अशी एकूण 12 मेडल्स उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून दिली जाणार आहेत.
निवड झालेल्या बुद्धिबळपटूंना स्पर्धा खेळण्यासाठी संघटनेचा टी-शर्ट व राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा खेळून आल्यावर प्रत्येकी एक हजार रुपये संघटनेच्या वतीने देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येकी रुपये दोनशे प्रवेश शुल्क ठेवले आहे. तरी इच्छुक बुद्धिबळपटूनी प्रवेश फी सह आपली नावे खालील व्यक्तीकडे नोंदवावीत.
1) आरती मोदी – 8149740405
2) मनीष मारुलकर – 9922965173
3) उत्कर्ष लोमटे – 9923058149
4) प्रितम घोडके – 8208650388
5) रोहित पोळ – 9657333926