Home मनोरंजन सुम्बुल तौकीर खान दिसणार ‘इत्ती सी खुशी’मध्ये प्रमुख भूमिकेत

सुम्बुल तौकीर खान दिसणार ‘इत्ती सी खुशी’मध्ये प्रमुख भूमिकेत

15 second read
0
0
105

no images were found

सुम्बुल तौकीर खान दिसणार ‘इत्ती सी खुशी’मध्ये प्रमुख भूमिकेत 

       सर्व वयोगटातील प्रेक्षकांना भावतील अशी हृदयस्पर्शी आणि संबद्ध कथानके सादर करणारी वाहिनी म्हणून सोनी सबची ख्याती आहे. या वाहिनीवर लवकरच एक नवीन कौटुंबिक नाट्य ‘इत्ती सी खुशी’ सादर होणार आहे आणि या मालिकेत प्रमुख भूमिका करणार आहे एक अत्यंत गुणी अभिनेत्री, सुमबुल तौकीर खान. पडद्यावरची प्रभावी उपस्थिती आणि अभिनयातील गहिरेपण हे सुम्बुलच्या अभिनयाचे ठळक विशेष आहेत. ती या मालिकेत अन्विता दिवेकर ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

        मुंबईच्या पार्श्वभूमीवरील ‘इत्ती सी खुशी’ ही मालिका अन्विता या 21 वर्षीय मुलीची गोष्ट आहे. सहा भावंडांमध्ये सर्वात मोठ्या असलेल्या अन्वितावर अचानक आपल्या कोसळणाऱ्या कुटुंबाला सावरण्याची जबाबदारी येऊन पडते. तिचे वडील दारूच्या व्यसनाशी झगडत आहेत आणि आई त्यांना सोडून गेली आहे. अशा वेळी अन्विताच आपल्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवते आहे. आपल्या भावंडांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तिने स्वतःचे शिक्षण आणि आशा-आकांक्षा बाजूला सारल्या आहेत. तिचा दैनंदिन अस्तित्वाचा संघर्ष, मूक बलिदान आणि तिच्यातील प्रेम आणि चिकाटी या मालिकेत बघायला मिळेल.

      अन्विता या व्यक्तिरेखेविषयी सुम्बुल तौकीर खान म्हणते, “‘इत्ती सी खुशी’ मालिकेत काम मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. या हृदयस्पर्शी आणि ऊबदार मालिकेत अन्विताची कहाणी सादर करण्यास मी उत्सुक आहे. अन्विता दिवेकर टेलिव्हिजनवरील साचेबंद व्यक्तिरेखा नाही. ती सर्वार्थाने मुंबईची मुलगी आहे. शांत पण न मोडणारी, प्रेमळ पण कडक. आपल्या पाच धाकट्या भावंडांसाठी ती आई झाली आहे. जबाबदारी आणि प्रेम या भावनेने ती प्रेरित आहे. साधी, अस्सल आणि आजच्या जगाशी संबद्ध असलेली अन्विता म्हणजे या कहाणीचा भावनिक गाभा आहे. ती एक मूक योद्धा आहे, जिच्यात चिकाटी, बलिदान आणि निरपेक्ष प्रेम करण्याची ताकद आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे   सोनी सब ची यादें माल…