Home उद्योग स्‍कोडा ऑटो इंडियाने आतापर्यंतचा सर्वोच्‍च सहामाही विक्रीचा टप्‍पा गाठला

स्‍कोडा ऑटो इंडियाने आतापर्यंतचा सर्वोच्‍च सहामाही विक्रीचा टप्‍पा गाठला

1 min read
0
0
47

no images were found

स्‍कोडा ऑटो इंडियाने आतापर्यंतचा सर्वोच्‍च सहामाही विक्रीचा टप्‍पा गाठला

 

कोल्हापूर, : स्‍कोडा ऑटो इंडिया प्रगतीच्‍या दिशेने झपाट्याने वाटचाल करत आहे, जेथे भारतात २५वा वर्धापन दिन आणि जागतिक स्‍तरावर १३० वे वर्ष साजरा करत आहे. २०२५ च्‍या पहिल्‍या सहामाहीमध्‍ये ३६,१९४ हून अधिक युनिट्सच्‍या विक्रीसह स्‍कोडा ऑटोने भारतातील आपल्‍या २५ वर्षांच्‍या इतिहासामध्‍ये सर्वोच्‍च सहामाही विक्री संपादित केली आहे. 

       स्‍कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक आशिष गुप्‍ता म्‍हणाले, ”आमच्‍या महत्त्वपूर्ण सहामाही विक्रीमधून भारतातील ग्राहकांनी स्‍कोडा उत्‍पादने व सर्विसेसचा केलेला अवलंब दिसून येतो. आमच्‍या ग्राहकांना दररोज विश्‍वातील सर्वोत्तम स्‍थळांना एक्‍स्‍प्‍लोअर करायला आवडते. आमच्‍या पोर्टफोलिओमध्‍ये कायलॅकची भर करण्‍यासह आम्‍ही आता ‘एसयूव्‍ही फॉर एव्‍हरीवन’च्‍या माध्‍यमातून, तसेच आमच्‍या सेदान ऑफरिंगच्‍या माध्‍यमातून त्‍यांचा प्रवास अधिक सुखकर व उत्‍साहवर्धक करत आहोत. 

         विक्री विक्रम स्‍थापित करत आहे 

२०२५ च्‍या पहिल्‍या सहामाहीत ३६,१९४ हून अधिक युनिट्सच्‍या विक्रीसह स्‍कोडा ऑटो इंडिया आता भारतातील टॉप सात ऑटोमोटिव्‍ह ब्रँड्समध्‍ये सामील झाली आहे. २०२४ मधील रँकिंग्‍जच्‍या तुलनेत कंपनीने चार पोझिशन्‍स वर झेप घेतली आहे. तसेच, स्‍कोडा ऑटो इंडियाने २०२२ मधील २८,८९९ युनिट्सच्‍या सर्वोत्तम सहामाही विक्रीला मागे टाकले आहे. 

        ग्राहकांसाठी अधिक सोयीसुविधा 

२०२१ मध्‍ये १२० टचपॉइण्‍ट्स वरून स्‍कोडा ऑटो इंडियाने आपले नेटवर्क आजच्‍या तारखेपर्यंत २९५ हून अधिक टचपॉइण्‍ट्सपर्यत विस्‍तारित केले आहे. कंपनी २०२५ च्‍या अखेरपर्यंत ३५० टचपॉइण्‍ट्सचा टप्‍पा गाठण्‍याच्‍या आपल्‍या ध्‍येयाप्रती कटिबद्ध आहे, ज्‍यासाठी भारतभरात विनासायास ग्राहक अनुभव देण्‍याप्रती कटिबद्धता अधिक दृढ करत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…