no images were found
दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या विविध अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ
कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राची शैक्षणिक वर्ष २०२५ -२६ ची बी.ए.,बी.कॉम,एम.ए.(मराठी, हिंदी, इंग्रजी,समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास),एम.कॉम.,एम.एस्सी.(गणित),एम.बी,ए, (डिस्टन्स) तसेच एम.कॉम.,एम.एस्सी. (गणित),एम.बी.ए. (ऑनलाईन मोड) आदी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस गुरुवार दि.३१ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती प्र.संचालक डॉ.के.बी.पाटील यांनी दिली.
डॉ.पाटील म्हणाले की,दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे.त्यामुळे जे अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत, ज्यांचे शिक्षण अपूर्ण आहे. अशा विद्यार्थी, गृहिणी, कामगार, सैनिक, उद्योजक,शेतकरी, सरकारी कर्मचारी,खाजगी कंपन्या आदींना दूरशिक्षण आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या एकूण ८७ अभ्यासकेंद्रात प्रवेशाची संधी मिळणार आहे. त्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर Distance Education लिंक वर प्रवेशाबाबतची जाहिरात उपलब्ध असून http://sukapps.unishivaji.ac.in/studentregistration/#/ या ऑनलाईन लिंकवर आपला प्रवेश आजच निश्चित करावा.
जे विद्यार्थी नियमित महाविद्यालय व मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेशित झालेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीचा ही लाभ मिळणार आहे.त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातील विविध अभ्यासक्रमाना प्रवेश घ्यावा.अधिक माहितीसाठी शिवाजी विद्यापिठातील मुख्य कार्यालयाशी अथवा नजीकच्या महाविद्यालयातील अभ्यासकेंद्राशी संपर्क साधावा. असे आवाहन प्र.संचालक डॉ.के.बी.पाटील यांनी केले आहे.