Home उद्योग टोयोटा किर्लोस्कर मोटरचा नवीन सिटी ऑफिसचा शुभारंभ

टोयोटा किर्लोस्कर मोटरचा नवीन सिटी ऑफिसचा शुभारंभ

11 second read
0
0
50

no images were found

टोयोटा किर्लोस्कर मोटरचा नवीन सिटी ऑफिसचा शुभारंभ

 

     टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) यांनी आज महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर (सीएसएन) येथे त्यांच्या नवीन सिटी ऑफिसचे उद्घाटन केल्याची घोषणा केली. महाराष्ट्रातील उपस्थिती बळकट करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, भारताच्या ऑटोमोबाईल उद्योगात योगदान देण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार यातून होतो.जुलै 2024 मध्ये टीकेएम आणि महाराष्ट्र शासन यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानंतर (MoU) ही विकास प्रक्रिया सुरू झाली. या कराराचा उद्देश या भागात एक ग्रीनफिल्ड उत्पादन सुविधा उभारण्याचा आहे. छत्रपती संभाजीनगरमधील हे नवीन कार्यालय टीकेएमच्या प्रादेशिक कामकाजासाठी एक महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे, जे औद्योगिक विकास, टिकावू प्रगती, कौशल्ययुक्त मनुष्यबळ निर्माण आणि समाजासाठी योगदान यावर लक्ष केंद्रित करेल.

          चिकलठाणा येथील प्रोझोन मॉलजवळ असलेल्या एबीसी ईस्ट या ठिकाणी वसलेले हे 7000 चौरस फूट क्षेत्रफळ असलेले कार्यालय श्री. मासाकाझू योशिमुरा (चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, टीकेएम) आणि श्री. स्वप्नेश मारू (उप-व्यवस्थापकीय संचालक – कॉर्पोरेट प्लॅनिंग, ग्रीन फील्ड प्रकल्प) यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.

 

या उद्घाटनप्रसंगी श्री. स्वप्नेश मारू म्हणाले, “छत्रपती संभाजीनगरातील आमच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन प्रादेशिक पातळीवर बाजारपेठेतील सहभाग वाढवण्यासाठी आणि स्थानिक हितधारकांशी दृढ संबंध प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. जागतिक दर्जाच्या उत्पादन क्षमतेसह मराठवाड्यात रोजगारनिर्मिती, कौशल्यविकास आणि समावेशी प्रगती घडवून आणण्याच्या आमच्या वचनबद्धतेतून हे पाऊल पुढे टाकण्यात आले आहे.

 

सरकारच्या सक्रिय पाठबळामुळे या भागातील औद्योगिक परिवर्तनात आमचा वाटा महत्त्वपूर्ण ठरेल, आणि ‘विकसित भारत @2047’ या राष्ट्रीय उद्दिष्टाशी हे पूर्णपणे सुसंगत आहे.”

 

‘ग्रो इंडिया – ग्रो विथ इंडिया’ या तत्वज्ञानाने प्रेरित होऊन, छत्रपती संभाजीनगरातील या नवीन कार्यालयाचे उद्घाटन भारताच्या प्रगतीतील टोयोटाची दृढ आस्था आणि दीर्घकालीन बांधिलकी दर्शवते. नवोन्मेष, शाश्वतता आणि स्थानिक सक्षमीकरण यांच्या आधारे, टीकेएम आपली मोबिलिटी इकोसिस्टम मजबूत करत राहणार आहे, ज्यामुळे प्रादेशिक आणि राष्ट्रीय विकासाला चालना मिळेल.सामंजस्य कराराच्या पुढील टप्प्यांमध्ये टीकेएम स्थानिक इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेत आहे. यात उद्योग सुसंगत कौशल्यविकास कार्यक्रमांचे आयोजन, तसेच शैक्षणिक संस्थांना पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे. या प्रयत्नांद्वारे टीकेएम एक दर्जेदार, जागतिक दर्जाचे मनुष्यबळ तयार करून समावेशी आणि टिकावू प्रगतीस हातभार लावणार आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…