no images were found
महाराष्ट्र ऑलिंपिक स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा महिला संघ रवाना
कोल्हापूर : बालेवाडी येथे होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिंपिक स्पर्धेसाठी के एस ए कोल्हापूर जिल्हा महिला संघ रवाना झाला आहे. कोल्हापूरचा पहिला सामना शुक्रवारी या गोंदिया संघाबरोबर होणार आहे. महाराष्ट्र ऑलम्पिक गेम्स् फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा सहा जानेवारी ते नऊ जानेवारी, या कालावधीत होणार आहेत.
स्पर्धेसाठी कोल्हापूर स्पोर्ट्स् असोसिएशनच्या वतीने जिल्हा महिला फुटबॉल संघ निवड चाचणी व प्रशिक्षण शिबीर पोलो ग्राऊंड, न्यू पॅलेस व आर.के.नगर येथे घेण्यात आले. राजेंद्र दळवी, नितीन जाधव व प्रा. अमर सासने यांच्या मार्गदर्शनाखाली एआयएफएफ डी लायसन्स कोच अमित साळोखे व पृथ्वी गायकवाड यांनी प्रशिक्षण शिबीरातील खेळाडूंना मार्गदर्शन केले.
संघातील खेळाडूंची नांवे अशी : भक्ती रामा बिरनगड्डी, गौरी विजय चव्हाण, रिया विनय बोळके, प्रत्युषा राहूल नलवडे, स्नेहल सुधीर सुतार, सौमय्या विनोद कागले, सानिका दत्तात्रय भोसले, राजनंदिनी रमेश भोईटे, सानिया भगवान पाटील, शाहिन सरदार मुलाण्णी, आरती संजय काटकर, ऋतुजा शिवाजी पाटील, तनुजा सुरेश चौगुले, शिवानी मारूती पाटील, निदा निसार सतारमेकर, दिव्या विजय माने, अंजली अनिल हिंदलगेकर, श्रृतिका सुहास सुर्यवंशी, पूर्वा सुभाष भोसले, साक्षी सतिश खाडे. मार्गदर्शक अमित साळोखे व व्यवस्थापक म्हणून कु. पृथ्वी गायकवाड.
ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन कार्यकारिणी सदस्य व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या व विफाच्या महिला समिती चेअरमन मधुरिमाराजे छत्रपती यांनी संघास शुभेच्छा दिल्या. यावेळी के.एस.ए.चे पदाधिकारी- राजेंद्र दळवी, विश्र्वंभर मालेकर, मनोज जाधव, दीपक घोडके, प्रदीप साळोखे उपस्थित होते.