no images were found
महाराष्ट्र ऑलम्पिक स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा पुरूष फुटबॉल संघ रवाना
कोल्हापूर : बालेवाडी येथे होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेसाठी के एस ए कोल्हापूर जिल्हा फुटबॉल संघ नुकताच रवाना झाला आहे. कोल्हापूरचा पहिला सामना शुक्रवारी दुपारी चार वाजता परभणी संघाबरोबर होणार आहे.महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन आयोजीत महाराष्ट्र ऑलम्पिक गेम फुटबॉल स्पर्धा सहा जानेवारी ते नऊ जानेवारी या कालावधीत होणार आहेत.
के.एस.ए.फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी, नितीन जाधव, संभाजीराव पाटील-मांगोरे, विश्र्वंभर मालेकर, प्रा. अमर सासने, दिपक घोडके व निखील कदम यांनी निवड चाचणीचे कामकाज पाहिले. संघातील खेळाडूंची नांवे अशी : गोलकिपर- अनिकेत रघुनाथ पोवार, मयुरेश राजेंद्र चौगुले, राहुल नाना पाटील, कैलास महादेव पाटील, रोहन सुधाकर आडनाईक, ओंकार शिवाजी मोरे, सुमित संजय घाटगे, संकेत नितीन साळोखे, करण रविंद्र चव्हाण-बंद्रे, प्रथमेश विजय हेरेकर, ऋतुराज कुमार सुर्यवंशी, विशाल वसंत पाटील, ऋतुराज शिवाजी संकपाळ, प्रभू सुरेश पोवार, अरबाज जहांगीर पेंढारी, संकेत उमेश जाधव, ऋतुराज चंद्रशेखर पाटील, विशाल वसंत पाटील, रोहीत राजेंद्र पोवार, सतेज संतोष साळोखे, संकेत सचिन मेढे. मार्गदर्शक प्रा. अमर सासने व निखील कदम.
ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन कार्यकारिणी सदस्य व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या व विफाच्या महिला समिती चेअरमन मधुरिमाराजे छत्रपती यांनी संघास शुभेच्छा दिल्या. यावेळी के.एस.ए.चे पदाधिकारीराजेंद्र दळवी, विश्र्वंभर मालेकर, मनोज जाधव, दिपक घोडके, प्रदीप साळोखे उपस्थित होते. संघास संस्थेचे पेट्रन-इन्चीफ् शाहू छत्रपती महाराज, माजी खासदार युवराज संभाजीराजे, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे, मधुरिमाराजे छत्रपती यांचे प्रोत्साहन लाभले.