no images were found
Nothing भारतात सादर करत आहेत त्यांचा पहिलावहिला फ्लॅगशीप NOTHING PHONE (3) आणि हेडफोन (1) हे पहिले ओव्हर-इअर ऑडिओ उत्पादन
Nothing या लंडनस्थित तंत्रज्ञान कंपनीने आज भारतात त्यांची अशी दोन उत्पादने सादर केली ज्यामुळे संबंधित विभागातील मापदंड नव्याने रचले जातील. Nothing Phone (3) हा त्यांचा खऱ्या अर्थाने पहिला फ्लॅगशीप स्मार्टफोन आणि Nothing Headphone(1) हे पहिले ओव्हर इअर ऑडिओ उत्पादन सादर करण्यात आले. विचारपूर्वक डिझाइन आणि वैशिष्ट्यपूर्ण नाविन्यतेसह ग्राहकोपयोगी तंत्रज्ञानाला नवे स्वरूप देण्याचा Nothingचा दृष्टिकोन या दोन्ही उत्पादनांतून प्रतित होत आहे.
Nothing Phone (3) मुळे स्मार्टफोनचा परफॉर्मन्स आणि अभिव्यक्तीचे एक नवे पर्व सुरू झाले आहे. तंत्रज्ञान पुन्हा एकदा आपलेसे वाटावे यासाठी खास तयार करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये कमी प्रकाशातही सुंदर फोटो काढता यावेत यासाठी या क्षेत्रातील सर्वोत्तम अशा 1/1.3” मेन सेन्सरसह प्रो ग्रेड ट्रिपल कॅमेरा प्रणाली, लॉसलेस ऑप्टिकल झूम आणि पूर्ण ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह सर्व लेन्सेसमध्ये सिनेमॅटिक 4K 60fps व्हिडीओची सोय आहे. अल्ट्रा नॅरो बेझल्ससह अत्यंत सुंदर 6.67″ AMOLED डिस्प्ले, दमदार Snapdragon® 8s Gen 4 chipset ही सगळी वैशिष्ट्ये प्रीमिअम दर्जाच्या मॉड्युलर डिझाइनमध्ये देण्यात आली आहेत. यातील Glyph Matrixमुळे वापरकर्त्यांना महत्त्वाची माहिती चटकन मिळते शिवाय Flip to Record आणि Glyph Toys सारख्या वैशिष्ट्यांमुळे गुंतवून ठेवणारा खेळकर अनुभव मिळतो. Phone(3) मध्ये नवा ट्राय-कॉलम लेआऊट देण्यात आला आहे. या नव्याने डिझाइन करण्यात आलेल्या R अँगल आकारामुळे अर्गोनॉमिक्सही अधिक चांगले झाले आहेत. फोनच्या पुढच्या बाजूला एकसारख्या १.८७ मिमी. कडा आहेत. त्यामुळे Phone (2) च्या तुलनेत हा फोन १८ टक्के स्लिम किंवा पातळ आहे. तसेच यात अधिक शार्प, सुस्पष्ट आणि गुंतवून ठेवणारा AMOLED स्क्रीनचा अनुभव मिळतो.
Nothing Headphone (1) सह Nothing ने ओव्हर इअर ऑडिओ विभागात पदार्पण केले आहे. KEF सहकार्याने तयार करण्यात आलेल्या या हेडफोनमध्ये उत्कृष्ट डिझाइन आणि सुयोग्य तंत्रज्ञानाचा सुंदर मेळ पहायला मिळतो. यातील खास ४० मिमी. दमदार ड्रायव्हर, हेड ट्रॅकिंगसह रिअल टाईम स्पेटिअल ऑडिओ अशा वैशिष्ट्यांमुळे या आवाजात तुम्ही अगदी गुंतून जाल. दैनंदिन वापर आणि ऑडिलोफाइल परफॉर्मन्ससाठी खास बनवण्यात आलेल्या Nothing Headphone (1) मध्ये हाय-रेज ऑडिओ, LDAC, USB-C लॉसलेस प्लेबॅक आणि ३.५ मिमी. वायर्ड मोड आहेत. यात एएनसीसह ३५ तासांपर्यंतचा प्लेबॅक टाइम मिळतो तसेच फक्त ५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये २.४ तासांपर्यंत वापर शक्य होतो. यातील ड्युएल डिव्हाइस कनेक्टिव्हिटी, एआय समर्थित कॉलची सुस्पष्टता तसेच चॅनल हॉप आणि अॅडव्हान्स ईक्यू सारखी इन अॅप कस्टमायझेशन टूल्स यामुळे सोयीस्कर आणि वैयक्तिक वापराला प्राधान्य मिळते.