Home शासकीय पर्ल हॉटेल समोरील अनधिकृत फुलवाले केबिनवर अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत कारवाई

पर्ल हॉटेल समोरील अनधिकृत फुलवाले केबिनवर अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत कारवाई

12 second read
0
0
42

no images were found

पर्ल हॉटेल समोरील अनधिकृत फुलवाले केबिनवर अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत कारवाई

 

कोल्हापूर (प्रतिनिधी): महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत मंगळवारी पर्ल हॉटेल ते महादेव मंदिर या पसिरातील मुख रस्त्यावरील अनधिकृत केबिन व दुकानाबाहेर लावण्यात आलेले साहित्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 6 केबिन, 3 हातगाड्या, 38 फुले स्टॅन्ड, 26 छत्र्या जप्त करण्यात आल्यात तसेच 23 अनधिकृत केबिन बाहेरील छपऱ्या काढण्यात आल्या तर 7 केबिन स्वतः मालकांनी काढून घेतल्या.

         सदरची कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहा.आयुक्त स्वाती दुधाणे, शहर अभियंता हर्षजीत घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधीक्षक विलास साळूंखे, सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, मुकादम रविंद्र कांबळे व अतिक्रमण कर्मचारी-यांच्या मार्फत करण्यात आली. 

         तरी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने येथून पुढेही शहरामध्ये अनाधिकृत फेरीवाले व रोडवरील दुकाना बाहेर लावण्यात आलेल्या अनाधिकृत शेडवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधीत दुकान धारकांनी व फेरीवाल्यांनी आपले अनाधिकृत असलेले अतिक्रमण स्वत: काढून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

घराला पूर्णत्व देणाऱ्या बाईची हृदयस्पर्शी कथा ‘बाई तुझा आशीर्वाद’

घराला पूर्णत्व देणाऱ्या बाईची हृदयस्पर्शी कथा ‘बाई तुझा आशीर्वाद’ मराठी मालिका विश्वात नेह…