no images were found
टोयोटा किर्लोस्कर मोटर आणि ओहमियम यांच्यात भारतात स्केलेबल हायड्रोजन-आधारित ऊर्जा उपाय विकसित करण्यासाठी सामंजस्य करार
नवी दिल्ली,: कार्बन न्यूट्रॅलिटी आणि स्वच्छ ऊर्जा नवकल्पनांप्रती आपली बांधिलकी अधोरेखित करत टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने आज बेंगळुरूस्थित ओहमियम इंटरनॅशनल या आघाडीच्या पीईएम हायड्रोजन तंत्रज्ञान प्रदात्यासोबत भारतात ग्रीन हायड्रोजनवर आधारित एकत्रित ऊर्जा उपाय सह-विकसित करण्यासाठी सामंजस्य करार (एमओयू) केला. या कराराअंतर्गत भारतात ग्रीन हायड्रोजन-आधारित एकत्रित ऊर्जा उपायांचे सह-विकास केले जाईल. ही धोरणात्मक भागीदारी ग्रीन हायड्रोजनला भविष्यातील स्वच्छ इंधन म्हणून पुढे नेण्यासाठी टोयोटाच्या फ्युएल सेल तंत्रज्ञानातील महत्त्वाच्या भूमिकेला अधोरेखित करते. तसेच हे कंपनीच्या मोबिलिटी आणि स्थिर ऊर्जा उपयोगांमधून मजबूत हायड्रोजन अर्थव्यवस्था उभारण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे उदाहरण आहे.
भारताने 2047 पर्यंत ऊर्जा स्वावलंबन प्राप्त करण्याचे आणि 2070 पर्यंत नेट झिरो उत्सर्जन साध्य करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी देशाच्या ऊर्जा संक्रमण प्रक्रियेत सर्व आर्थिक क्षेत्रांमध्ये नवनिर्मित ऊर्जा वापर वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रीन हायड्रोजन हा या बदलासाठी एक आशादायक पर्याय म्हणून उदयास येत आहे. दीर्घकालीन नवीकरणीय ऊर्जा संचय, औद्योगिक क्षेत्रातील जीवाश्म इंधनांचे पर्याय (विशेषतः अवघड उद्योग क्षेत्रांमध्ये), स्वच्छ वाहतूक आणि विकेंद्रित ऊर्जा निर्मिती यासाठी ग्रीन हायड्रोजन प्रभावी ठरू शकतो. या दृष्टीकोनाशी सुसंगत, भारत सरकारने 2023 मध्ये राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मोहिम सुरू केली, ज्याचा उद्देश स्थानिक गुंतवणूक आणि संशोधनाच्या आधारे आत्मनिर्भर हायड्रोजन अर्थव्यवस्था निर्माण करणे आहे. टॉयोटाच्या जागतिक ‘एन्व्हायर्नमेंटल चॅलेंज 2050’ या उपक्रमाच्या मार्गदर्शनाखाली टीकेएम या दृष्टीकोनाशी एकनिष्ठ राहून स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील पुढाकारात अग्रेसर राहिली आहे. हे सामंजस्य करार भारताच्या ऊर्जा संक्रमणासाठी हायड्रोजनचा संपूर्ण उपयोग करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
मोबिलिटीच्या पलीकडे: ग्रीन ऊर्जा-चालित नवप्रवर्तनाला गतिशीलतेसह एकत्रित करणे
या सहकार्याचा उद्देश दोन्ही संस्थांच्या पूरक क्षमतांचा लाभ घेणे आहे. ओहमियम ही एक पीईएम हायड्रोजन तंत्रज्ञान कंपनी असून ती मॉड्युलर, किफायतशीर व स्केलेबल पीईएम इलेक्ट्रोलायझर्सद्वारे ग्रीन हायड्रोजन निर्मितीत तज्ञ आहे; आणि टोयोटा ही फ्युएल सेल तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी असून हायड्रोजनच्या विविध उपयोगांमध्ये शाश्वततेसाठी प्रयत्नशील आहे. दोन्ही पक्ष एकत्रितपणे मायक्रोग्रिडसारख्या एकत्रित ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या ऊर्जा उपायांची शक्यता तपासतील, जे डेटासेंटर्स, पर्यावरणसंवेदनशील दूरस्थ भाग इत्यादी ठिकाणी वापरले जाऊ शकतात. हे उपाय भारताच्या राष्ट्रीय ऊर्जा संक्रमण ध्येयांना बळकटी देतील.
या उपक्रमांतर्गत, टीकेएम तांत्रिक कौशल्य, प्रणाली एकत्रीकरणासाठी सहाय्य आणि फ्युएल सेल मॉड्युल्सचा पुरवठा करेल. ओहमियम मायक्रोग्रिड सोल्यूशन प्रोटोटाइपचे डिझाइन, विकास आणि कार्यप्रदर्शन मूल्यमापन करेल. हे संयुक्त प्रयत्न कार्यक्षम, व्यवहार्य आणि स्केलेबल स्वच्छ ऊर्जा उपाय तयार करण्याच्या उद्देशाने आहेत, जे भारताच्या ऊर्जा गरजांनुसार अनुरूप ठरतील.
भविष्यासाठी उभारणी – भारतातील टोयोटाचा हायड्रोजन प्रवास
टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) भारताच्या हायड्रोजन प्रवासात एक अग्रणी कंपनी ठरली आहे. सुरुवातीच्या मोबिलिटी पायलट प्रकल्पांपासून विविध स्वच्छ ऊर्जा उपायांपर्यंत सातत्याने प्रगती करत आहे. टोयोटा ही हायड्रोजनवर आधारित फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेइकल (एफसीईव्ही) आणणारी पहिली कंपनी ठरली असून तिने 2022 मध्ये आयकॅट (इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी) च्या सहकार्याने टोयोटा मिराई डेमो प्रोजेक्ट सुरू केला होता. हा प्रकल्प केवळ तंत्रज्ञानाचे प्रदर्शन नव्हते, तर प्रत्यक्ष वापरातली वाहनाची कार्यक्षमता तपासणे, जनजागृती करणे, आणि व्यवहार्य हायड्रोजन उपयोगासाठी माहिती गोळा करणे या उद्दिष्टांनी प्रेरित होता. याच प्रयत्नांच्या पुढील टप्प्यात, टीकेएमने केरळ सरकारसोबत भागीदारी करून एफसीईव्ही व्यवहार्यता अभ्यास देखील सुरू केला आहे, जो संपूर्ण भारतात हायड्रोजन-आधारित शाश्वत पायलट उपक्रमांप्रती त्यांच्या वचनबद्धतेला बळकटी देतो.
या गतीला चालना देत, 2023 च्या सुरुवातीस, टीकेएमने अशोक लेलँडसोबत सामंजस्य करार (एमओयू) केला, ज्याअंतर्गत हायड्रोजनवर चालणाऱ्या प्रोटोटाइप व्यावसायिक वाहने विकसित करण्यासाठी फ्युएल सेल मॉड्यूल (एफसीएम) पुरवण्यात येणार आहे. या उपक्रमांद्वारे प्रवासी वाहतुकीपलीकडे हायड्रोजन तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याच्या टोयोटाच्या उद्दिष्टांचा प्रत्यय येतो, आणि भारताच्या स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण भागीदार म्हणून तिची भूमिका अधोरेखित होते.
ओहमियमसोबतचा टीकेएमचा नवा सामंजस्य करार ही कंपनीच्या प्रवासातील एक धोरणात्मक झेप आहे, ज्यामध्ये मोबिलिटीपलीकडे जाऊन हायड्रोजनवर आधारित ऊर्जा निर्मिती आणि तिच्या इकोसिस्टमच्या विकासावर भर दिला जातो. उच्च क्षमतेच्या भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांबरोबर अशा संयुक्त उपक्रमांद्वारे टीकेएम.’मेक इन इंडिया’ संकल्पनेला बळ देत आहे. जागतिक तंत्रज्ञान ज्ञानाचे रूपांतर देशाच्या ऊर्जा गरजांनुसार सुसंगत, स्थानिक स्तरावर उपयुक्त आणि पर्यावरणपूरक उपायांमध्ये करत आहे.
या सातत्यपूर्ण उपक्रमांमध्ये मिराई एफसीईव्ही पायलट प्रकल्पांपासून ते एफसीएम मॉड्यूल पुरवठ्यापर्यंत आणि आता या स्वच्छ ऊर्जा सहकार्यापर्यंत टीकेएमने भारतात हायड्रोजनवर आधारित समाज निर्माण करण्याच्या दीर्घकालीन बांधिलकीचे प्रतिबिंब दिसते. असा समाज जो हायड्रोजनचे उत्पादन, साठवण, वितरण आणि विविध क्षेत्रांतील वापर यांना सहजपणे एकत्रित करतो, आणि त्याच वेळी भारताच्या नवीकरणीय ऊर्जा संबंधित महत्त्वाकांक्षांशी सुसंगत राहतो. या संपूर्ण दृष्टीकोनाचे मूलभूत तत्त्व म्हणजे नवोन्मेष, सहनिर्मिती आणि स्थानिकीकरणाच्या माध्यमातून भविष्यासाठी बांधणी करणे.
या महत्त्वपूर्ण टप्प्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना, भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे माननीय केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी म्हणाले, “हायड्रोजन ही एक स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत असून, ती भविष्यातील इंधन म्हणून ओळखली जाते आत्मनिर्भर आणि कार्बन-न्यूट्रल भारत घडविण्यासाठी एक महत्त्वाची किल्ली आहे. या दिशेने भारत सरकारकडून ऊर्जा आणि परिवहन क्षेत्रात नवोन्मेषाला चालना देणारे अनेक प्रगतीशील उपक्रम राबवले जात आहेत. विशेषतः, अनेक उद्योगपती, स्टार्ट-अप्स आणि संशोधक हायड्रोजन क्षेत्रात नव्या संधींचा शोध घेत आहेत, ज्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये शाश्वततेला चालना मिळत आहे. हायड्रोजनच्या संपूर्ण क्षमतेचा वापर करण्यासाठी धोरणात्मक दृष्टिकोन स्वीकारणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून देशासाठी स्वच्छ, परवडणारी आणि विश्वासार्ह ऊर्जा भविष्य सुनिश्चित करता येईल.
राष्ट्रीय प्राधान्यांशी सुसंगत आणि अधिक हरित, शाश्वत उद्याच्या दृष्टीकोनाशी जुळणारी विस्तारक्षम आणि स्वदेशी हायड्रोजन उपाययोजना विकसित करण्यासाठी कॉर्पोरेट्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी कंपन्या सक्रियपणे योगदान देताना पाहणे विशेषतः उत्साहवर्धक आहे. मी टॉयोटा आणि ओहमियम यांचे अभिनंदन करतो की त्यांनी प्रगत हायड्रोजन क्षमतांद्वारे स्वच्छ ऊर्जा पर्यायांसाठी ठोस प्रयत्न केले आहेत, जे ‘आत्मनिर्भर भारत अभियान’शी सुसंगत आहेत.”
सामंजस्य कराराच्या आदानप्रदान प्रसंगी उपस्थित असलेले, भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे माननीय केंद्रीय राज्य मंत्री श्री. श्रीपाद येस्सो नाईक म्हणाले, “विस्तारक्षम आणि स्थानिक पातळीवर विकसित उपायांना चालना देणारे उपक्रम भारताच्या कमी-कार्बन अर्थव्यवस्थेच्या संक्रमणाला गती देण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. या दृष्टिकोनात, विविध क्षेत्रांतील उद्योगांचा महत्त्वपूर्ण सहभाग असेल, जो 2030 पर्यंत आत्मनिर्भर ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टम घडविण्याच्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी महत्त्वाचा ठरेल. त्यांची नवोन्मेषक्षम क्षमता आणि स्थानिक गरजांनुसार तयार केलेले उपाय हे भारताच्या ऊर्जा संक्रमणाचा कणा ठरतील. नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन भारताला स्वच्छ ऊर्जा नवोन्मेष आणि त्याच्या अंमलबजावणीत जागतिक नेतृत्व मिळवून देण्याची दृष्टी ठेवते. ही दृष्टी साध्य करण्यासाठी हायड्रोजन मूल्यसाखळीतील देशांतर्गत क्षमतांना बळकट करणे अत्यावश्यक आहे. टॉयोटा किर्लोस्कर मोटर आणि ओहमियम यांच्यातील अशा धोरणात्मक भागीदाऱ्या भारताला हायड्रोजनवर आधारित हरित ऊर्जा भविष्याकडे नेण्याच्या प्रक्रियेला लक्षणीय गती देऊ शकतात.”
टीकेएम आणि ओहमियम यांच्यातील सामंजस्य कराराबाबत प्रतिक्रिया देताना, दिल्ली सरकारच्या उद्योग, अन्न आणि पुरवठा, पर्यावरण, वन आणि वन्यजीव विभागाचे माननीय मंत्री श्री. मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले,“भारत पर्यावरण नेतृत्वाच्या दिशेने ठोस पावले उचलत असताना, अशा उपक्रमांमुळे स्थानिक पातळीवर शाश्वत परिवर्तनासाठीची आपली बांधिलकी अधिक मजबूत होते. ग्रीन हायड्रोजन हे वायुप्रदूषण कमी करण्यासाठी, औद्योगिक डीकार्बोनायझेशनसाठी, आणि स्वच्छ, भविष्याभिमुख इकोसिस्टमच्या विकासासाठी एक आशादायक उपाय आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर आणि ओहमियम यांच्यातील ही भागीदारी जागतिक नवकल्पना आणि स्थानिक कौशल्य यांचे एकत्रीकरण करून स्केलेबल ग्रीन एनर्जी उपाय निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. अशा भागीदारी टिकाऊ औद्योगिक क्षेत्र आणि प्रदूषणमुक्त समाज उभारण्यासाठी अत्यावश्यक असून, आपल्या हरित आणि निरोगी भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहेत.”