Home स्पोर्ट्स प्रत्‍येक शहरातून, गावातून ऑलिम्‍पिकवीर तयार झाले पाहिजे : क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे

प्रत्‍येक शहरातून, गावातून ऑलिम्‍पिकवीर तयार झाले पाहिजे : क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे

2 min read
0
0
188

no images were found

प्रत्‍येक शहरातून, गावातून ऑलिम्‍पिकवीर तयार झाले पाहिजे : क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे

 

 

 

पुणे ः प्रत्‍येक शहरातून, गावातून जास्‍तीतजास्‍त ऑलिम्‍पिकवीर तयार झाले पाहिजे, आगामी २०२८, २०३२ मधील ऑलिम्‍पिकमध्ये भारताला जास्‍तीत जास्‍त पदके मिळतील व या यशात  महाराष्ट्राचा मोठा वाटा असेल असे प्रतिपादन राज्‍याचे क्रीडा व युवक कल्‍याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यातील ऑलिम्‍पिक दिनाच्‍या समारंभात केले. राज्‍यात आज ऑलिम्‍पिक दौड, खेळाडूंचा गौरव व क्रीडा प्रात्‍यक्षिकांने क्रीडामय वातावरणात ऑलिम्‍पिक दिन साजरा करण्यात आला.

       महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि सर परशुराम महाविद्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमानेआयोजित ऑलिम्‍पिक दिन समारंभात  ऑलिम्‍पिकपटू व अर्जून पुरस्‍कार खेळाडूंना गौरव करण्यात आला. क्रीडा व युवक कल्‍याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्‍या हस्‍ते ऑलिम्‍पिकपटू रेखा भिडे, मनोज पिंगळे, अर्जून पुरस्‍कार प्राप्‍त शंकुतला खटावकर, श्रीरंग ईनामदार, शांताराम जाधव, प्रदिप गंधे, स्‍मिता यादव, ऑलिम्पिक पत्रकार  संजय दुधाणे, युवा खेळाडू गायत्री शिंदे, गाथा खडके  यांचा शाल, सन्‍मानचिन्‍ह, पुष्पगुच्‍छ देऊन गौरव करण्यात आले. या प्रसंगी क्रीडा व युवक कल्‍याण विभागाच्‍या आयुक्‍त शीतल तेली-उगले, सहसचंालक सुधीर मोरे, उपसंचालक उदय जोशी, सुहास पाटील, युवराज नाईक, सर परशुराम महाविद्यालय प्राचार्य डॉ. सुनील गायकवाड, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिंरगांवकर, जिल्‍हा क्रीडाधिकारी जगन्‍नाथ लकडे, धनंजय भोसले आदी मान्‍यवर उपस्‍थित होते.  

       ऑलिम्पिक दिनानिमित्त सकाळी ८ वाजता ऑलिम्‍पिक दौड काढण्यात आली.  ऐतिहासिक लाल महाल येथे क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून दौड सुरू करण्यात आली. दौडीस शालेय विदयार्थ्यांना मोठा प्रतिसाद लाभला. सायकलिंग व स्‍केटिंगपटूंही दौडीत सहभागी झाले होते. एनसीसीच्‍या शालेय बँन्‍ड पथकाच्‍या निनादात क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दौडीचे स्‍वागत केले. शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्‍यानंतर लेडी रमाबाई सभागृहामध्ये ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्‍या प्रतिमेला अभिवादन करून मुख्य समारंभ रंगला. मल्लखांब, योगा, जिम्नॅस्टिक, तायक्वांदो, किकबॉक्सिंग, स्‍केटिंग ड्रान्‍स व  मर्दानी खेळाचे प्रात्‍यक्षिकांनी उपस्‍थितींची मने जिंकली.

         खेळाडूंच्‍या गौरव समारंभानंतर राज्‍याचे क्रीडा व युवक कल्‍याण मंत्री दत्तात्रय भरणे, क्रीडा आयुक्‍त शीतल तेली-उगले यांची मनोगते झाली. खेळाडुंना पाठबळ देण्यासाठी राज्‍य सरकारने चांगले निर्णय घेतले आहे. क्रीडाखात्‍याने १४९ जणांना शासकीय  नोकरी दिली आहे असे सांगून राज्‍याचे क्रीडा व युवक कल्‍याण मंत्री दत्तात्रय (मामा) भरणे पुढे म्‍हणाले की राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्‍तरावर महाराष्ट्राच्‍या खेळाडुंनी पदके जिंकण्यासाठी राज्‍याचा क्रीडामंत्री म्‍हणून मी तुमच्‍या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.  

         महाराष्ट्रात अनेक गुणवान खेळाडू आहे. त्‍याचे प्रतिबिंब आपल्‍या पदकतालिकेत दिसले पाहिजे असे सांगून क्रीडा आयुक्‍त शीतल तेली-उगले यांनी सांगितले की, तळागळातून खेळाडू शोधण्यासाठी आपल्‍या योजना सुरू आहेत. विकसीत महाराष्ट्र २०४७ यासाठी क्रीडा क्षेत्राचे धोरण निर्माण होत आहे, यासाठी खेळाडूंसह क्रीडा क्षेत्रातील सर्वांनीच गुगल फार्मवर आपल्‍या सूचना मांडा. या सूचनांचे आम्‍ही स्‍वागत करू.कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक नामदेव शिंरगांवकर यांनी केले तर आभार प्रदिप गंधे यांनी मानले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…