no images were found
श्रेनु पारीख देवी पार्वतीच्या दमदार भूमिकेत दिसणार
समस्त कुटुंबासाठी मालिका सादर करणारी वाहिनी म्हणून प्रख्यात असलेल्या सोनी सबवर लवकरच ‘गाथा शिव पार्वती की – गणेश कार्तिकेय’ ही पौराणिक मालिका सुरू होत आहे, जि भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात भव्य मालिकांपैकी एक असेल. सर्वात शक्तिशाली आणि दिव्य देवांच्या परिवाराची महान गाथा ही मालिका सादर करेल. ही मालिका प्रामुख्याने भगवान शिव, देवी पार्वती आणि त्यांची मुले गणेश आणि कार्तिकेय यांच्या माहीत नसलेल्या कथा सादर करेल. मालिकेच्या मुळाशी माता-पित्याची सुजाणता, दोन भावांचा प्रवास आणि कुटुंबाच्या भावना आहेत.
मालिकेच्या भव्यतेत भर घालत अभिनेत्री श्रेनु पारीख या ब्रह्मांडाचे संचालन, संरक्षण आणि परिवर्तन करणाऱ्या देवी पार्वतीच्या रूपात दिसणार आहे. पार्वतीच्या दिव्य शक्तींच्या पलीकडे ती या कुटुंबाचे भावना-केंद्र देखील आहे. ती एक समर्पित माता, प्रेमळ पत्नी आणि उग्र संरक्षक आहे. गणेशावरील तिचे अपार प्रेम आणि कार्तिकेयशी असलेले जटिल नाते याविषयीच्या कथा या मालिकेत बघायला मिळतील.
पार्वतीची भूमिका करत असल्याबद्दल श्रेनु पारीख म्हणते, “गणेश कार्तिकेय’ मालिकेत देवी पार्वतीची भूमिका करण्याचा गौरव मला मिळाला आहे. पार्वती हे केवळ शक्ती आणि संतुलनाचे मूर्त स्वरूप नाही, तर ती सखोल भावना जपणारी एक माता आणि पत्नी देखील आहे. आपल्या दिव्य कथांच्या मुळाशी देखील कसे प्रेम, अपराध, लवचिकता आणि एकत्रित असल्याची भावना आहे हे या मालिकेत सुंदर पद्धतीने दाखवले आहे. देवीचे शक्तीशाली पण तरीही मानवी चित्रण प्रेक्षकांसमोर घेऊन येताना मला कृतकृत्य वाटते आहे.”
अद्भुत दृश्ये, उत्कृष्ट कथानक आणि हृदयस्पर्शी परफॉर्मन्स यामुळे ‘गणेश कार्तिकेय’ नक्कीच सर्व पिढ्यांमधील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल!