no images were found
विकसित भारत संकल्प यात्रा अभियानाच्या दुसऱ्या टप्यातील विविध योजनेचा 5594 लाभार्थ्यांना लाभ
कोल्हापूर : : विकसित भारत संकल्प यात्रा प्रभावीपणे राबवून केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 14 योजना तळागाळातल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. केंद्र शासनाने राज्य शासनाच्या सहकार्याने ज्या योजनांचे लाभ लक्ष्यीत लाभार्थ्यांपर्यंत पोहचलेले नाहीत अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शासन स्तरावर विकसीत भारत संकल्प यात्रा मोहिम देशव्यापी केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येत आहे. या संकल्प यात्रा मोहिमेचा दुसरा टप्पा मंगळवार, दि. 6 ते 16 फेब्रुवारी 2024 या कालावधीत कोल्हापूर शहरात राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत दि.6 ते 8 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ही संकल्प यात्रा सावित्रीबाई फुले रुग्णालय, फिरंगाई आरोग्य केंद्र, राजारामपूरी 9 वी गल्ली आरोग्य केंद्र, पंचगंगा रुग्णालय, कसबा बावडा व महाडीक माळ आरोग्य केंद्र याठिकाणी राबविण्यात आली. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 62, पी.एम.स्वनिधीसाठी 107, आयुष्यमान भारत कार्ड साठी 2483, उज्वला योजना 10, संकल्प योजना 111, आधारकार्ड 100, मेरी कहानी योजनेअंतर्गत 36 लाभार्थ्यांनी आपली नोंदणी केली आहे. तर आरोग्य विभागाच्या हेल्थ कॅम्पमध्ये 2685 नागरीकांनी आपली तपासणी करुन घेतली आहे. या संकल्प यात्रेच्या ठिकाणी 3 दिवसात 3550 नागरीकांनी भेट देऊन या नागरीकांनी 5594 योजनांचा लाभ घेतला.