Home सामाजिक अग्निशमन विभागाकडील फायरमन सुनिल यादव यांची कौतुकास्पद  कामगिरी

अग्निशमन विभागाकडील फायरमन सुनिल यादव यांची कौतुकास्पद  कामगिरी

6 second read
0
0
24

no images were found

अग्निशमन विभागाकडील फायरमन सुनिल यादव यांची कौतुकास्पद 

कामगिरी

कोल्हापूर  : आज सकाळी 9.40 वाजता कदमवाडी कपुर वसाहत येथील घरामध्ये घरगुती गॅस लिकेज होऊन आग लागली होती. याची माहिती अग्निशमन विभाग मुख्य नियंत्रण कक्षामध्ये कळताच वर्दीवर असणारे अग्निशमन विभागाकडील अग्निशमन वाहन तात्काळ रवाना करण्यात आले. त्यापुर्वी कपूर वसाहतीच्या जवळच राहणारे फायरमन सुनील यादव यांना आगीची माहिती कळताच त्यांनी आग लागलेल्या ठिकाणी धाव घेवुन शेजारच्या शाळेतील फायर एक्सटींग्युशरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्याचबरोबर लिकेज झालेले दोन सिलेंडर घराच्या बाहेर काढले. त्यामुळे याठिकाणी होणारा मोठी दुर्घटना टळली. फायरमन सुनिल विलास यादव हे ड्युटीवर नसतांना देखील त्यांना कर्तव्याची जाण असल्याने स्व:तचा जीव धोक्यात घालुन त्यांनी आग विझवली. सदरचे फायरमन महानगरपालिका अग्निशमन विभागामध्ये गेली 12 वर्ष ठोकमानधन फायरमन म्हणुन कार्यरत असुन त्यांचे कपुर वसाहत परिसरामध्ये राहणा-या नागरीकांकडुन कौतुक होत आहे.

Load More Related Articles

Check Also

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे  

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे   …