
no images were found
करुणा पांडे आपल्या पहिल्या पावसाच्या अनुभवाबद्दल म्हणते, “तो फारच शांत आणि सुंदर क्षण होता”
सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत पुष्पाचे काम करणारी करुणा पांडे बऱ्याचदा पडद्यावर आणि प्रत्यक्षात देखील मूक ताकदीची क्षमता अनुभवत असते. आपल्या व्यक्तिरेखेनुसार, करुणा देखील आयुष्यातील छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेण्यात मानते आणि आणि पहिल्या पावसाइतका हा अनुभव कधी येणार?
या पवसाळ्यातील पहिल्या पावसाची आठवण काढत करुणा म्हणते की क्वचितच असणाऱ्या युनिट-ऑफ च्या दिवशीच बरोबर पावसाने संधी साधली! “मला पहिला पाऊस आठवतो आहे… मी घरीच होते, संध्याकाळच्या वेळी मी माझ्या कुत्र्यांशी खेळत होते आणि एकीकडे चहाचा आनंद घेत होते. अचानक पाऊस आला, सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि मग मुसळधार पाऊस कोसळू लागला. सगळी सृष्टी कशी एकदम टवटवीत होऊन गेली!”
ती पुढे म्हणते, “दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहते तो सगळीकडे ताजी टवटवीत पाने दिसत होती. झाडे हिरवीगार आणि जिवंत दिसत होती. तो इतका शांत आणि सुंदर क्षण होता. मी बाहेर गेले नाही, पण निसर्गच माझ्या खिडकीपाशी आला होता. मला नृत्याची आवड असल्यामुळे मी संगीत ऐकले आणि त्यावर थोडा पदन्यास केला. खूपच छान दिवस होता.”
कधीकधी योग्य विराम मोठ्या क्षणांमध्ये मिळत नाही, तर स्थिर क्षणांमध्ये मिळतो. करुणासाठी ती पावसाळी संध्याकाळ अशीच होती.