Home मनोरंजन मनदीप कौरने धारण केला पारंपरिक राजस्थानी वधूचा लूक!

मनदीप कौरने धारण केला पारंपरिक राजस्थानी वधूचा लूक!

4 second read
0
0
7

no images were found

मनदीप कौरने धारण केला पारंपरिक राजस्थानी वधूचा लूक!

झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘वसुधा’ने  आपल्या भावनिक कथानक आणि अनपेक्षित वळणांसह प्रेक्षकांना गुंतवून ठेवले आहे. हल्लीच एका भागात प्रेक्षकांनी एक लक्षवेधी रूपांतर पाहिले – मेघा (मनदीप कौर) एका राजेशाही राजस्थानी वधूप्रमाणे अवतरली. कथानकात एका अ‍ॅड शूटच्या निमित्ताने आलेला हा प्रसंग सांस्कृतिक रंगत घेऊन आला आणि मेघाचा हा नवा अवतार सौंदर्य व शान यांचा उत्तम मिलाफ होता.

मनदीप कौरने पहिल्यांदाच स्क्रीनवर राजस्थानी नववधूची भूमिका साकारली आणि तिचे रूप अगदी राजेशाही भासत होते. गडद मरून रंगाच्या लेहंग्यावर बारकाईने केलेली सोनेरी नक्षीकाम, भरजरी चोळी आणि पारंपरिक राजस्थानी ड्रेसिंग स्टाइलमधील दुपट्टा यांसोबतच्या कुंदन दागिन्यांसह तिचा लूक अगदी खुलून आला — नथ, चोकर, लेयर्ड हार, बोरला मांगटिक्का, बांगड्या आणि कमरबंद यांचा त्यात समावेश होता. समृद्ध रंगसंगती, तपशीलवार पोत आणि देखण्या अ‍ॅक्सेसरीज यांनी लूकला भव्यतेसोबतच एक मोहकतेची छटा दिली. अशा साग्रसंगीत पोशाखात सजण्याचा हा पहिला अनुभव मनदीपसाठी अतिशय नवीन आणि समाधानकारक ठरला.

आपला अनुभव शेअर करताना मनदीप म्हणाली, “मी पहिल्यांदाच राजस्थानी वधूप्रमाणे सजले आणि त्याबद्दल खूप उत्साहात होते. मेघाचा लूक अधिक खुलण्यासाठी क्रिएटिव्ह टीमसोबत बसून मी त्यांची कल्पना समजून घेतली आणि काही सूचना देखील दिल्या. मला वाटलं की कमरबंद आणि पारंपरिक दुपट्ट्याची स्टाईल अधिक अस्सलपणा दाखवेल. जेव्हा मी आरशात स्वतःला पाहिले तेव्हा तो क्षण खरंच स्वप्नवत वाटला. पोशाख जड होता, पण भूमिकेत शिरल्यानंतर सगळं खूप सुंदर जमून आलं. माझ्या रोजच्या लूकपासून ही एक ताजी आणि वेगळी झलक होती आणि ती मला खूप आवडली – ती मूळांशी जोडलेली आणि राजेशाही भासणारी अशी होती!”

मनदीपचा हा नवा लूक प्रेक्षकांना आवडत असताना मालिकेतील तणाव वाढत चालला आहे. मेघा आणि देवांश (अभिषेक शर्मा) लग्न करण्याचा धक्कादायक निर्णय घेतात तेव्हा वसुधा (प्रिया ठाकूर) मनातून खचते. वसुधा आणि देवांश पुन्हा एकत्र येतील का, की ही त्यांच्या प्रेमकथेची अखेर असेल?

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ठाकरे बंधूंनी हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत यावे! : हेमंत पाटील 

ठाकरे बंधूंनी हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत यावे! : हेमंत पाटील    मुंबई, : मन…