Home शासकीय प्रवेशोत्सव – आनंददायी शिक्षणाची सुरुवात – के मंजुलक्ष्मी

प्रवेशोत्सव – आनंददायी शिक्षणाची सुरुवात – के मंजुलक्ष्मी

16 second read
0
0
87

no images were found

प्रवेशोत्सव – आनंददायी शिक्षणाची सुरुवात – के मंजुलक्ष्मी

कोल्हापूर (प्रतिनिधी): महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने आज दि.16 जून रोजी शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महापालिका व खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळा मधून सदर प्रवेशोत्सव कार्यक्रम राबवण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी स्वतः महापालिकेच्या वि. स. खांडेकर या शाळेस भेट दिली. तसेच महापालिकेचे सर्व अधिकाऱ्यांनीही शाळा भेट करून मार्गदर्शन केले. भागीरथी संस्थेच्या अरुंधती महाडिक यांनीही जरगनगर शाळेस भेट दिली. यामधून शाळांना एक प्रेरणा मिळाली.

       इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्व अधिका-यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेही सर्व मुलांना नवीन पाठ्यपुस्तके, गणवेश, खाऊ वाटप करण्यात आला. या प्रवेशोत्सवावेळी महापालिकेच्या विविध शाळांनी वेगवेगळे उपक्रम राबवून नविन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यामध्ये काही ठिकाणी ट्रॅक्टर मधून फेरी काढून तर काही ठिकाणी मुलांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. आज शाळेच्या प्रथम दिनानिमित्त केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारा शालेय पोषण आहाराचा पुरवठाही करण्यात आला. प्रथम दिवस म्हणून मिष्टान्न ( गोड जेवण )  सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आले. तब्बल दोन महिन्यांनी शाळेचा परिसर आज मुलांच्या किलबिलाटाने गजबजुन गेला. काही मुले हसत हसत तर काही मुले आपल्या आईला बिलगुन रडतच शाळेत प्रवेश करत होते. एक आगळावेगळ्या पद्धतीचे स्वागत तसेच खाऊवाटप आणि नवीन पाठ्यपुस्तक मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

         प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने महापालिकेच्या शाळा भेटींचे काटेकोर नियोजन करण्यात आलेले होते. त्या नियोजनाप्रमाणे अधिकाऱ्यांनी आपल्याला दिलेल्या शाळेमध्ये भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व नविन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट ही प्रेरणादायी ठरली. सर्व शाळांनीही शाळा सुरू होण्यापूर्वी शाळा पूर्वतयारी करून ठेवलेली होती.

         यामध्ये महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडित पाटील, कपिल जगताप, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, उज्वला शिंदे, स्वाती दुधाने, कृष्णा पाटील, प्रशासनाधिकारी आर व्ही कांबळे, शहर अभियंता हर्षजीत घाटगे व इतर सर्व खातेप्रमुखांनीही शाळा भेटी देऊन शाळांना मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक, शिक्षण प्रेमी, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधींनी सदर प्रवेशोत्सवाला हजेरी लावली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…