
no images were found
घरफाळा विशेष कॅम्पमध्ये 17 इमारतींना मालमत्ता कराची आकारणी
कोल्हापूर : घरफाळा विभागाच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या विशेष कॅम्पमध्ये 17 मिळकतींना मालमत्ता कराची आकारणी करण्यात आली. घरफाळा विभागाच्यावतीने सोमवारी विभागीय कार्यालय क्रं.2 शिवाजी मार्केट (घरफाळा ऑफिस) अंतर्गत नविन कर आकारणी करणेकरीता 2 अर्ज कर आकारणीसाठी सादर झाले. त्याप्रमाणे प्राप्त 2 अर्जांवर कागदपत्र मागणीबाबत जागेवर नोटीस देवून पुढील दोन दिवसात त्यांचे अर्ज निर्गत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच मागील आठवडयापर्यंत घरफाळा विभागाकडे प्राप्त झालेल्या एकूण 17 अर्जदारांच्याकडून योग्य कागदपत्रांची पुर्तता करून घेवून त्या मिळकतींची कर आकारणी अंतीम करण्यात आली. प्राप्त 19 प्रकरणांना 15/2 ची नोटीस लागु करून कर आकारणी अंतीम करण्यात आली. या कॅम्पला उप-आयुक्त शिल्पा दरेकर व कर निर्धारक संग्राहक सुधाकर चल्लावाड यांनी भेट देवून मार्गदर्शन केले. तर कर अधिक्षक अशोक यादव यांनी दिवसभर कार्यालयात उपस्थित नागंरिकांच्या तक्रारींचे निवारण केले.
आज बुधवार, दि.19 ऑक्टोंबर 2022 रोजी विभागीय कार्यालय क्र.3, राजारामपुरी (घरफाळा विभाग) येथे विशेष कॅम्पचे आयोजन केले आहे तरी नागरीकांनी या लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासक डॉ.कांदबरी बलकवडे यांनी केले आहे.