Home मनोरंजन अभिनेता नमिक पॉलने सेटवरील कॉर्नरला बदलले वर्कआऊट झोनमध्ये

अभिनेता नमिक पॉलने सेटवरील कॉर्नरला बदलले वर्कआऊट झोनमध्ये

22 second read
0
0
14

no images were found

अभिनेता नमिक पॉलने सेटवरील कॉर्नरला बदलले वर्कआऊट झोनमध्ये

 

     झी टीव्हीवरील ‘कुमकुम भाग्य’ आपल्या मनावरील पकड घेणारे प्लॉटमधील टि्‌वस्ट्‌स आणि प्रगल्भ होत जाणारी पात्रे यांसोबत प्रेक्षकांचे हृदय जिंकत आहे. मालिकेतील हल्लीच्या अॅक्शनने भरलेल्या दृश्यांमध्ये शिवांश (नमिक पॉल) आपली पत्नी प्रार्थना (प्रणाली राठोड) ला वाचवण्यासाठी मोठे प्रयत्न करत असून तो गुंडांसोबत मारामारीही करतो. त्याच्या ऑनस्क्रीन कामाने प्रेक्षक अतिशय प्रभावित झाले असून उत्तम शरीरयष्टी राखण्यासाठी नमिक ऑफस्क्रीन किती मेहनत घेतो आणि शिस्त राखतो ते फारच कमी लोकांना ठाऊक आहे.

       कामाचे दीर्घ तास आणि चित्रीकरणाचे डिमांडिंग स्वरूप यांव्यतिरिक्तही नमिकने ‘कुमकुम भाग्य’च्या सेटवरच फिटनेसला आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा हिस्सा बनवले आहे. आपल्या कामाप्रतिची सशक्त मूल्ये आणि निरोगी राहण्याबद्दलची वचनबद्धता यांसह त्याने दोन दृश्यांच्या दरम्यान सक्रिय राहण्यासाठी हलकेफुलके स्ट्रेचेस ते सेटवरच बॉडीवेट वर्कआऊट्‌स असा कलात्मक मार्ग शोधून काढला आहे. तो आपल्या डाएटमध्ये संतुलन राखतो आणि बहुतेकदा घरी बनवलेले जेवणच जेवतो आणि आपल्या शरीराला नियमितपणे हायड्रेट करतो, ज्यामुळे त्याला ऊर्जा राखायला आणि आपले केंद्रित ठेवायला मदत होते. 

       नमिक पॉल म्हणाला, “माझ्यासाठी आरोग्य आणि तंदुरूस्ती यांच्यासोबत कधीच तडजोड होऊ शकत नाही. हे केवळ एखाद्या प्रकारे दिसण्याबद्दल नसून आतून सशक्त वाटणे, तरतरी असणे आणि माझ्या मन आणि शरीरावर माझे नियंत्रण असण्याबद्दल आहे. ‘कुमकुम भाग्य’च्या सेटवर दृश्यांच्या दरम्यान जेव्हा मला उसंत मिळते तेव्हा मी काही पुश–अप्स मारतो, जंपिंग जॅक्स करतो किंवा केवळ निव्वळ वॉक करतो.”

     तो पुढे म्हणाला, “मी हेल्दी स्नॅक्स आणतो, स्वतःला व्यवस्थित हायड्रेट करतो आणि दिवसभर काय खातो याबद्दल मी जागरूक असतो. पण माझा संतुलनावर विश्वास आहे त्यामुळे कधीकधी मी चीट मीलचाही आस्वाद घेतो. काही वेळेस छोट्‌या छोट्‌या गोष्टींचीही मजा लुटायला हवी. ज्या दिवशी मी चित्रीकरण करत नसतो, तेव्हा मी जिममध्ये मेहनत करतो. माझे वर्कआऊट्‌स स्ट्रेन्थ ट्रेनिंग, मसल कंडिशनिंग आणि कार्डिओ यांचा मिक्स असतात. शेवटी फिटनेस ही केवळ एक संकल्पना किंवा चेकलिस्ट आयटम नव्हे तर त्यामुळेच मी जमिनीवर पाय रोवून उभा राहू शकतो, माझे ध्यान केंद्रित राहते आणि माझे सर्वोत्तम देण्यासाठी मी कायम तयार असतो.”

      ह्या इंडस्ट्रीमध्ये कामाचे दीर्घ तास आणि भावनिकदृष्ट्‌या गहनतेची गरज भासत असताना आपले आरोग्य राखणे हे ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देण्यासाठीचा उत्तम उपाय असल्याचे नमिकने सिद्ध केले आहे. ऑनस्क्रीन त्याची व्यक्तिरेखा आपल्या पत्नीसाठी झगडत असताना, काय शिवांश आणि प्रार्थनाचा प्रवास त्यांना प्रेमापर्यंत घेऊन जाईल का?

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक      …