Home शासकीय शहरातील प्रधानमंत्रीआवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत नविन घरकुलाकरीता फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू

शहरातील प्रधानमंत्रीआवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत नविन घरकुलाकरीता फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू

19 second read
0
0
7

no images were found

शहरातील प्रधानमंत्रीआवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत नविन घरकुलाकरीता फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू

कोल्हापूर (प्रतिनिधी):- शहरातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत नविन घरकुल मंजूरी करीता फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून ते फॉर्म सध्या भरण्यात येत आहेत. यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० योजनेमध्ये लाभ घेण्याकरीता महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजना कक्षात सर्व कागदपत्रांसह  संपर्क करावा. तसेच नागरीक स्वत: देखील https://pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024/PmayDefault.aspx या वेब पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करू शकतात.

         या योजनेसाठी भारतादेशामध्ये लाभार्थी तसेच कुटूंबामधील इतर सदस्यांच्या नावे पक्के घर नसावे. लाभार्थ्यांने गेल्या २० वर्षात कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा ३.०० लक्ष रुपयांची असावी असे निकष आहेत. या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी अर्जदाराचे आधार कार्ड (मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक), उत्पन्नाचे चालु वर्षाचे प्रमाणपत्र (तहसीलदार यांचे), पॅन कार्ड, जात प्रमाणपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक (आधार लिंक असलेले), मालमत्ता पत्रक, बांधकाम परवाना किंवा बांधकाम परवानगीकरीता जमा केलेला पुरावा आवश्यक, अर्जदार यांचे आई व वडिलांचे आधारकार्ड (हयात नसल्यास मृत्यू प्रमाणपत्र), अर्जदार यांचे कुटूंबामधील सर्व सदस्यांचे आधार कार्ड (पती/पत्नी व अविवाहित मुले), पी.एम.स्वनिधी, इमारत बांधकाम कामगार, पी.एम विश्वकर्मा या योजनेचा लाभ घेतलेला असल्यास नोंदणी प्रत आवश्यक आवश्यक आहे. 

         लाभार्थ्यांनी PMAY-U 2.0 मधील कोणत्याही एका घटकामध्ये लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी नागरिकाने तपशील काळजीपूर्वक वाचवा आणि समजून घ्यावा. एकदा घटक निवडल्यानंतर, तो बदलला जाऊ शकत नाही. कोल्हापूर महानगरपालिका प्रधानमंत्री आवास योजना कक्षाद्वारे पात्रता पडताळनी केल्याशिवाय PMAY-U 2.0 योजनेचा लाभ मिळण्यासाठी नागरिक पात्र होणार नाहीत. त्यामुळे Online अर्ज केल्यानंतर अर्जाच्या प्रिंटसह आवश्यक कागदपत्रे महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या कार्यालयात जमा करणे अनिवार्य राहील. याबाबतीत अधिक माहितीकरीता महापालिकेच्या छत्रपती शिवाजी मार्केटमधील ३ रा मजला, प्रधानमंत्री आवास योजना कक्षास संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

नवउद्योजकांना दुबईत उत्पादने निर्यातीसाठी मार्गदर्शन करणार : धनंजय दातार

नवउद्योजकांना दुबईत उत्पादने निर्यातीसाठी मार्गदर्शन करणार : धनंजय दातार    &nbs…