Home राजकीय आगामी महापालिकेसाठी भाजपा सज्ज : विजय जाधव

आगामी महापालिकेसाठी भाजपा सज्ज : विजय जाधव

23 second read
0
0
12

no images were found

आगामी महापालिकेसाठी भाजपा सज्ज : विजय जाधव

 

कोल्हापूर (प्रतिनिधी):- मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणूका चार महिन्यांच्या आत घेण्यात याव्यात असे आदेश दिले. त्यामुळे अनेक महीने थांबलेली शासकीय प्रक्रिया पुन्हा जोमाने कार्यरत झाली आहे. याचधर्तीवर आज भाजपा कोल्हापूरच्यावतीने जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते यांची आगामी महापालिका विषयात आढावा बैठक जिल्हा कार्यालयात संपन्न झाली. बैठकीच्या सुरुवातीला ऑपरेशन सिंदूर बद्दल भारतीय सैन्याचे अभिनंदन करण्यात आले. भारत माता की जय अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. 

        त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिर तीर्थक्षेत्र आराखड्याला करोडो रुपयांचा निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, नामदार चंद्रकांतदादा पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.

        जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी आपल्या प्रास्ताविका मध्ये आजच्या बैठकीची रूपरेषा सांगितली. तसेच आगामी काळात आपल्या प्रभागात नागरिकांच्यासाठी आवश्यक गोष्टी, उपक्रम, शिबिरे राबण्याचे आवाहन केले. आगामी काळात सह पालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या जनता दरबाराच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, आरोग्य कक्ष मुख्यमंत्री सहायता पेक्षा या माध्यमातून आरोग्याची मदत आपल्या प्रभागात करावी असे सांगत

       पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अनेक देशहिताचे निर्णय घेत आहेत. राज्यात भाजपा सरकार अनेक विकासकामे हात घेऊन ती मार्गी लावत आहे. त्यामुळे राष्ट्र हिताची, विकासाची अनुभूती प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी आगामी महापालिकेत भाजपाला मोठे यश मिळण्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने कार्यरत राहून पक्ष कार्यात सज्ज रहावे असे आवाहन केले. 

प्रदेश सचिव महेश जाधव यांनी मंडल अध्यक्षांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागातील आज-माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार, अन्य पक्षातील उमेदवार यांचा प्रभाग निहाय आढावा घेतला. तसेच उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सूचना जाणून घेतल्या.

जिंकण्याची जिद्द ठेवून सातत्याने मतदारसंघात कार्य राहिल्यास सध्याच्या पैशाच्या राजकारणामुळे आपला सर्वसामान्य कार्यकर्ता विजय होऊ शकतो असा विश्वास व्यक्त केला त्याचबरोबर आपल्या प्रभागाबरोबरच आपल्या शेजारील प्रभागात देखील कामाची सुरुवात करून आपल्या सहकार्याला देखील मदत करावी लागणार असल्याचे नमूद केले.भाजपा पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी असून जास्तीत जास्त कार्यकर्ते नगरसेवक होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

       याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, राहुल चिकोडे, विलास वासकर, गायत्री राऊत, डॉ राजवर्धन, रूपाराणी निकम, माधुरी नकाते, गिरीश साळोखे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महानगरपालिका जिंकण्यास महायुती सक्षम : क्षीरसागर   

महानगरपालिका जिंकण्यास महायुती सक्षम : क्षीरसागर      कोल्हापूर (प्रतिनिधी …