
no images were found
करवीर पीठाच्या वतीने अंबाबाईला अभिषेक उत्सवामध्ये दुसऱ्या दिवशी कीर्तनाने सांगता
कोल्हापूर, (प्रतिनिधी):– येथील शंकराचार्य पीठाच्या वतीने करवीर निवासिनी अंबाबाईला आज जगदगुरू विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.
जगदगुरू शंकराचार्य पीठामध्ये आद्य शंकराचार्यांच्या २५३३ व्या जयंतीनिमित्त ७ ते १२ मे या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये सकाळी सात वाजता देवतांना अभिषेक, आठ वाजता दशोपनिषद वाचन, गीताभाष्य, हवन आणि सायंकाळी पाच वाजता ब्रह्मसूत्रभाष्य पारायण यामध्ये रामायण झाले. रात्री आठ वाजता सौ. स्नेहलताई संतोष पित्रे यांच्या कीर्तनाने उत्सवाचा दुसरा दिवस संपला. सकाळी श्री स्वामी विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते करवीर निवासिनी अंबाबाईला विधिवत अभिषेक करण्यात आला. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन कार्यवाह शिवस्वरूप भेंडे यांनी केले.