
no images were found
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात बौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापना मायक्रेव्ह कन्सल्टंसी समवेत सामंजस्य करार
कोल्हापूर (प्रतिनिधी):-डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने मायक्रेव्ह कन्सल्टंसी अँड सर्व्हिसेस सोबत बौद्धिक संपत्ती अधिकार (आयपीआर) संबंधित सेवा आणि संशोधन क्षेत्रातील नवकल्पनांसाठी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे विद्यापीठात बौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन म्हणाले, संशोधन प्रक्रियेत रचनात्मक विचार अतिशय महत्वाचे आहेत. आपल्याकडील नवकल्पना संशोधनात रुपांतरीत करण्यासाठी आयपीआर कक्ष अतिशय उपयुक्त ठरेल.
कुलसचिव प्रा. डॉ. जे.ए. खोत म्हणाले, बौद्धिक संपत्ती अधिकाराचे व्यावसायिकीकरण महत्त्वाचे आहे. या कक्षाच्या माध्यमातून सर्व प्राध्यापकांनी नाविन्यपूर्ण संशोधनाद्वारे देशाच्या विकासात योगदान द्यावे.
मायक्रेव्ह कन्सल्टंसीचे उपाध्यक्ष किशोर शेंडगे यांनी यावेळी बौद्धिक संपत्ती अधिकराबाबत मार्गदर्शन केले. नवकल्पना आणि रचनात्मक कार्यासाठी आयपीआरचे महत्त्व समजावून सांगितले. आयपीआरचे संकल्पन, कॉपीराइट, ट्रेडमार्क, पेटंट दाखल करने, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, संगणक संबंधित शोध आणि आयपीआरच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती दिली.
अधिष्ठाता (संशोधन आणि विकास) आणि आयक्यूएसी डायरेक्टर डॉ. शिवानंद शिर्कोले, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिस प्रदीप पाटील यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी वित्त अधिकारी सुजीत सरनाईक, अधिष्ठाता प्रा. डॉ. मुरली भूपती, प्रा. डॉ. संग्राम पाटील यांचासह सर्व सहयोगी अधिष्ठाता व प्राध्यापक उपस्थित होते.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.