
no images were found
शिवाजी विद्यापीठाचे रसायनशास्त्रज्ञ डॉ. संजय चव्हाण यांना जर्मन पेटंट माहिती तंत्रज्ञानाला बळ देणाऱ्या रासायनिक संयुगाचा शोध
कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठाचे वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ. संजय चव्हाण यांनी आपल्या संशोधक विद्यार्थ्यांसह माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला बळ देणाऱ्या रासायनिक संयुगाच्या अनुषंगाने केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनाला नुकतेच जर्मन पेटंट मिळाले आहे.
‘सिस्टीम फॉर प्रिपेरिंग बायन्युक्लिअर कॉपर कॉम्प्लेक्सेस विथ कार्बन रिच अल्कीनील फंक्शनलाइज्ड सॅलिसिलीडीमाईन’ या विषयावर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील डॉ. संजय चव्हाण आणि त्यांचे विद्यार्थी अजित देशमुख, नमिता नाईकनवरे, कुमार चौधरी यांनी संशोधन केले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील डाटा ट्रान्स्फर, इमेज प्रोसेसिंग, लेझर तंत्रज्ञान इत्यादी बाबींसाठी हे संशोधन अत्यंत उपयुक्त आहे. यासाठी डॉ. चव्हाण यांना भारत सरकारच्या ‘डीएसटी-सर्ब’कडून संशोधन प्रकल्प प्राप्त झाला होता. त्यासाठी ३० लाख रुपयांचे अनुदानही मंजूर झाले.
या संशोधनाविषयी अधिक माहिती देताना डॉ. चव्हाण म्हणाले, कृत्रिम असेंद्रिय (सिंथेटिक इनऑर्गेनिक) रसायनशास्त्रामध्ये हे संशोधन महत्त्वाचे असून कार्बन-समृद्ध घटकांची रेषीय संरचना आणि इलेक्ट्रॉन डिलोकलायझेशनमुळे हे घटक डेंड्रायमर्स किंवा सुप्रामॉलेक्युलर असेंब्लीज तयार करण्यासाठी आदर्श ठरतात. ही असेंब्ली म्हणजे मूलद्रव्यामधील अतिसूक्ष्म अशी स्तरित संरचना असते, जी साधारणपणे एखाद्या झाडावरील पानांच्या रचनेप्रमाणे असते. नॅनोस्केल ऑप्टिकल, इलेक्ट्रॉनिक आणि प्रकाश उत्सर्जक उपकरणांच्या विकासासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरतात. तसेच, या संयुगांमध्ये आम्ल अथवा आम्लारी प्रेरित “ऑन-ऑफ” ल्यूमिनसन्स स्विचेस (प्रकाश चालू-बंद करण्याची क्षमता) म्हणून कार्य करण्याची क्षमता असते. तसेच सामान्य तापमानात उच्च फोटोप्रेरित कॅटॅलिटीक (उत्प्रेरक) क्रियाशीलता दर्शविल्यामुळे, त्यांचा वापर प्रगत लेझर उपकरण निर्मितीसाठी आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रो-ऑप्टिक उपकरणांच्या विकासामध्येही उपयुक्त ठरेल.
—
डॉ. संजय चव्हाण यांच्याविषयी…
डॉ. संजय चव्हाण गेली २५ वर्षे शिवाजी विद्यापीठात कार्यरत असून त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फेलोशिप, पुरस्कार मिळाले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा येथील ऑस्ट्रेलियन नॅशनल विद्यापीठात तसेच मेलबर्न येथील मोनॅश विद्यापीठात त्यांनी संशोधन केले आहे. प्रा. चव्हाण यांनी युजीसी, डीएसटी-सर्ब, भारत सरकार यांचे विविध संशोधन प्रकल्प पूर्ण केले असून भारत व ऑस्ट्रेलिया यांच्या संयुक्त संशोधन कार्यक्रमांतर्गत भारत-ऑस्ट्रेलिया धोरणात्मक रिसर्च फंडांतर्गत ऑस्ट्रेलियाच्या प्रा. मार्क हंम्फ्री, प्रा. रॉबर्ट स्ट्रेंजर, प्रा. बॅरी लुथर डेविस, प्रा. मॅरॅक सिमॉक या नामवंत ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांबरोबर तसेच रामन रिसर्च इन्स्टिट्यूट बेंगलोर येथील प्रा. रेजी फिलिप्स व सेंट्रल युनिव्हर्सिटी, हैदराबाद येथील प्रा. नारायण राव व इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, चेन्नई येथील प्रा. विजयन यांच्याबरोबर संशोधन प्रकल्प पूर्ण केला आहे. डॉ. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली १५ विद्यार्थ्यांनी पीएच.डी पूर्ण केली असून सध्या ५ विद्यार्थी पीएच.डी करत आहेत. त्यांचे ८० हून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. सन २००२ मध्ये इंडियन कौन्सिल ऑफ केमिस्ट यांचा ‘यंग सायंटिस्ट पुरस्कार’, २००५ मध्ये इंडियन सायन्स अकॅडमी, भारत सरकार यांची इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स, बेंगलोर येथे व्हिजिटिंग सायंटिस्ट फेलोशिप, २००७ मध्ये डीएसटी, भारत सरकार यांची ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी, कॅनबेरा येथे बॉईजकास्ट फेलोशिप, २०११ मध्ये ऑस्ट्रेलियन गव्हर्मेंट एन्डव्हर रिसर्च फेलोशिप अवॉर्ड, तर २०१५ ला ऑस्ट्रेलियन गव्हर्मेंटचा परदेशस्थानांना उच्चतम एन्डव्हर एक्झिक्युटीव्ह रिसर्च फेलोशीप अवॉर्ड प्राप्त झाले आहेत. ऑस्ट्रेलियन संशोधकाबरोबर केलेल्या संशोधन कामगिरीबद्दल, ऑस्ट्रेलियन एन्डव्हर अवॉर्ड लेपल पिन देऊन ऑस्ट्रेलिया सरकारने प्रा. चव्हाण यांना सन्मानित केले आहे. त्यांनी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्पेन व फ्रान्स इत्यादी देशांना विविध परिषदांच्या निमित्ताने भेटी दिल्या आहेत. त्यांच्या शैक्षणिक व संशोधन कार्याबद्दल महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स यांनी २०१९ मध्ये फेलो