
no images were found
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
कोल्हापूर, : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 5 ते 18 वर्षादरम्यान शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रांत विशेष नैपुण्य दर्शविणा-या बालकांना हा पुरस्कार दिला जातो. ऑनलाईन अर्ज http://awards.gov.in या संकेत स्थळावर स्वीकारले जातील. दि. 31 जुलै 2025 रोजी पाच वर्षाहून अधिक व 18 वर्षाहून कमी वय असलेल्या मुलांसाठी अर्ज करता येणार आहेत. जिल्ह्यातील पात्र बालकांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे यांनी केले आहे.