Home स्पोर्ट्स अखिल भारतीय आंतर विद्यापीठ रोड सायकलिंग स्पर्धांमध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे घवघवीत यश. 

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ रोड सायकलिंग स्पर्धांमध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे घवघवीत यश. 

4 second read
0
0
11

no images were found

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ रोड सायकलिंग स्पर्धांमध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे घवघवीत यश. 

 

कोल्हापूर (प्रतिनिधी):- दि. १० ते १३ एप्रिल 2025 रोजी बिकानेर, राजस्थान येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ रोड सायकलिंग स्पर्धांमध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर च्या खेळाडूंनी अतिशय उत्तम कामगिरी करत १ रजत व १ कांस्य पदकाची कमाई केली. श्री. हनुमान यशवंत चोपडे याने पुरुष Mass Start (१०० कि.मी.) या चित्त थरारक अशा क्रीडा प्रकारात २.५७.१८ अशी वेळ नोंदवत, अतिशय प्रभावी कामगिरी करत कास्य पदक मिळवले. तसेच महिला Criterium (३० कि.मी.) या क्रीडा प्रकारात कु. योगेश्वरी महादेव कदम हिने अगदी शेवटच्या क्षणी गुजरातच्या खेळाडूस मागे टाकून (८ गुण) मिळवत रजत पदकावर आपले नाव कोरले. या शिवाय कु. साक्षी तुकाराम पाटील हिने (६ गुण) मिळवत चतुर्थ क्रमांक पटकाविला. तब्बल बारा वर्षानंतर शिवाजी विद्यापीठाने अखिल भारतीय विद्यापीठ रोड सायकलिंग क्रीडा प्रकारात यश मिळवले आहे. या संघचे प्रा. सुशीलकुमार गायकवाड हे प्रशिक्षक म्हणून तसेच प्रा. संतोष जाधव हे सहा. प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. प्रा. अजय मराठे यांच्याकडे संघ व्यवस्थापक म्हणून जबाबदारी आहे. या संघास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. डी.टी. शिर्के, प्र.कुलगुरू प्रा.डॉ. पी. एस पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे , क्रीडा अधिविभाग चे संचालक डॉ. शरद बनसोडे यांचे प्रोत्साहन लाभले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे  

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे   …