
no images were found
महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी
कोल्हापूर, : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते दिपक देवाळकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र याविषयी मार्गदर्शन केले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी पंचसूत्रांचा उपयोग करुन बारा बलुतेदारांना सोबत घेवून दैनंदिन गरजा भागवण्यासाठी समाजामध्ये बदल घडवला, विधवांचे पुनर्वसन, सत्यशोधक समाजाची स्थापना, मुलींचे शिक्षण यासाठी आपले संपुर्ण जीवन व्यतीत केले. त्यांच्या या कार्याचे स्मरण म्हणून डॉ.डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमास उप जिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, तहसिलदार निवडणूक महेश खिलारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश घुले, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, सहायक लेखाधिकारी कविता गायकवाड, कार्यालय अधिक्षक सचिन पाटील, गायक संगीतकार कबीर नाईकनवरे, मानसिंग जगताप, माजी फेस्कॉम अध्यक्ष नामदेवराव कांबळे, समाजभूषण पुरस्कारार्थी, डॉ.डी.वाय.पाटील रक्तपेढीचे श्री.कांबळे, समाज कल्याण विभागाकडील पुरस्कार प्राप्त पुरस्कार्थी तसेच कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन परब व आभार कार्यालय अधिक्षक सचिन पाटील यांनी केले.