
no images were found
मत्स्योत्पादन उद्योजकता विकासाबाबत
शिवाजी विद्यापीठात २४ पासून मार्गदर्शन
कोल्हापूर,(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागातर्फे दि. २४ ते २७ मार्च या कालावधीत मत्स्योत्पादन आणि मत्स्यपालन या विषयावरील मूल्यवर्धित उद्योजकता विकास अभ्यासक्रम उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पीएम-उषा सॉफ्ट स्कील विकास कार्यक्रमांतर्गत दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयाच्या सहकार्याने हा उपक्रम होत आहे. ही माहिती समन्वयक तथा प्राणीशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. एस.आर. यन्कंची यांनी दिली.
दि. २४ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ होईल. मत्स्य महाविद्यालयाच्या मत्स्योत्पादन अभियांत्रिकी विभाचे प्रमुख डॉ. बी.आर. चव्हाण हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार आणि आयक्यूएसी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर प्रमुख उपस्थित असतील.
या तीनदिवसीय मार्गदर्शन सत्रात रत्नागिरीचे डॉ. ए.एस. पावसे, डॉ. जी.एस. घोडे, डॉ. आर.एम. तिबिले, डॉ. वर्षा भटकर, डॉ. संगीता वसावे, उद्गीर (लातूर)चे डॉ. सोमनाथ यादव, साताऱ्याचे डॉ. व्ही. वाय. देशपांडे आणि उपक्रमाचे संयोजक डॉ. माधव भिलावे मार्गदर्शन करणार आहेत.