Home राजकीय भ्रष्टाचाराने डागाळलेल्यांनी सत्ताधाऱ्यांना शहाणपणा शिकवू नये-हेमंत पाटील

भ्रष्टाचाराने डागाळलेल्यांनी सत्ताधाऱ्यांना शहाणपणा शिकवू नये-हेमंत पाटील

14 second read
0
0
161

no images were found

भ्रष्टाचाराने डागाळलेल्यांनी सत्ताधाऱ्यांना शहाणपणा शिकवू नये-हेमंत पाटील

 

 

पुणे,: भ्रष्टाचाराने डागाळलेल्यांनी सत्ताधाऱ्यांना शहाणपणा शिकवू नये,अशा शब्दात इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल केला. १०० कोटींची वसुली प्रकरणी तुरूंगात जावून आलेले देशमुख यांनी ईव्हीएम संदर्भात दिशाभूल करणारे वक्तव्य केले असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.विधानसभेच्या निवडणुकीत ‘ईव्हीएम डुप्लिकेट, मतदार याद्या डुप्लिकेट आणि यामुळे झालेला सत्ताधाऱ्यांचा विजयही डुप्लिकेट’असे वक्तव्य देशमुख यांनी केले होते.पंरतु,यंदा जनतेची काळजी असल्याचे दाखवून मलिदा लागणाऱ्या ‘डुल्पिकेट’ नेत्यांनाच मतदारांनी घरी बसवल्याचे देशमुख यांच्या जिव्हारी लागले आहे, असे पाटील म्हणाले.

         महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सरकारची आर्थिक स्थिती बिघडली.सरकारच्या डोक्यावरील कर्जाची डोंगर वाढले. एकमेकांच्या पक्षावर कुरघोडी करण्यातच तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी धन्यता मानली. सरकारचे नेतृत्व खंबीर नसल्याने महाराष्ट्राची त्याकाळात पिछेहाट झाली. पंरतु, आता देवेंद्र फडणवीस यांच्या सारखे खंबीर नेतृत्व जनतेने निवडून दिले आहेत. मात्र,महायुती सरकारच्या कार्यकाळात रखडलेल्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी फडणवीस सरकार ने वेग धरला आहे.

          विरोधकांच्या डोळ्यांमध्ये राज्याचा विकास खुपतोय, कुठलेही मुद्दे समोर करीत ते केवळ राजकारण करीत असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.शेतकऱ्यांची कर्जमाफी, लाडक्या बहिणी तसेच इतर योजनांना कमी पडणाऱ्या निधीसाठी महाविकास आघाडी सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप यानिमित्ताने पाटील यांनी केला. विरोधकांकडे कुठलाही मुद्दा शिल्लक नसल्यामुळे ते अशाप्रकारे वक्तव्य करीत आहेत.ईव्हीएम संदर्भात देशमुखांकडून करण्यात आलेले विधान हे खोटे असून जनमानसात संभ्रम निर्माण करणारे असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…