
no images were found
रणवीर सिंग बनला स्कोडा ऑटो इंडियाचा पहिला ‘ब्रँड सुपरस्टार5 हे
‘
कोल्हापूर , : आपली पहिली सब-४-मीटर एसयूव्ही कायलॅक लाँच केल्यानंतर स्कोडा ऑटो इंडियाने आणखी एक टप्पा संपादित केला आहे, जेथे आपला पहिला ‘ब्रँड सुपरस्टार’ म्हणून पॉवरहाऊस रणवीर सिंगची घोषणा केली आहे. हा सहयोग सिग्नेचर, स्कोडा स्टाइल, ग्राहक-केंद्रित मोहिमांशी संलग्न आहे, ज्यांना स्कोडा ऑटा इंडियाचे चाहते व ग्राहकांसाठी रणवीर सिंगने अधिक उत्साहित केले आहे.
या सहयोगाबाबत मत व्यक्त स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पीटर जनेबा म्हणाले, भारतातील आमच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच मला स्कोडा ऑटो इंडियासाठी पहिला ‘ब्रँड सुपरस्टार’ म्हणून रणवीर सिंगची घोषणा करण्याचा अभिमान वाटत आहे. पडद्यावर व पडद्यामागे टॅलेंट व ऊर्जेचा पॉवरहाऊस रणवीरच्या व्यक्तिमत्त्वामधून आमची आवड आणि तत्त्व दिसून येतात. आम्ही जागतिक सर्वोत्तमतेची १३० वर्षे साजरी करत असताना ही घोषणा करण्यात आली आहे. या सहयोगांतर्गत आमची उत्पादने, आमचे नेटवर्क आणि ग्राहकांसाठी अनेक गोष्टी सादर केल्या जाणार आहेत, जेथे आम्ही युरोपबाहेर स्कोडासाठी सर्वात महत्त्वपूर्ण बाजारपेठ म्हणून आमचे स्थान अधिक प्रबळ करण्यास उत्सुक आहोत.
स्कोडा ऑटो इंडियासाठी पहिले ब्रँड सुपरस्टार रणवीर सिंग म्हणाले, मला स्कोडा ऑटो इंडियाचा पहिला ब्रँड सुपरस्टार बनण्याचा आनंद होत आहे. या सहयोगामधून सर्वोत्तमतेप्रती समान कटिबद्धता दिसून येते आणि मी भारतात स्कोडा ऑटोच्या विकासाप्रती योगदान देण्यास उत्सुक आहे. स्कोडा ऑटोचा वैविध्यपूर्ण व उत्साहवर्धक उत्पादन पोर्टफोलिओ आहे, जो भारतातील वाढत्या बाजारपेठेमधील ऑटोमोटिव्ह उत्साही आणि व्यापक ग्राहकवर्गाच्या गरजांची पूर्तता करतो. प्रबळ वारसा आणि उत्पादनांच्या आयकॉनिक श्रेणीसह ब्रँड ऑटोमोटिव्ह उद्योगामध्ये उच्च मापदंड स्थापित करत आहे. जम