
no images were found
एसएमएफजी इंडिया क्रेडिटने पशु विकास दिनानिमित्त पशु कल्याण शिबिराने प्रस्थापित केले गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
एसएमएफजी इंडिया क्रेडिटने “सर्वात मोठे पशु कल्याण शिबिर (विविध ठिकाणे)” यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा मान मिळवत इतिहास रचला आहे. भारतातील 6 ठिकाणी 517 सहभागींसह हा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. हा ऐतिहासिक टप्पा कंपनीच्या पशु विकास दिन(पीव्हीडी) देशभरातील सर्वात मोठे एकदिवसीय पशुकल्याण शिबीराच्या 7व्या सत्राचा भाग म्हणून गाठण्यात आला.
भारतात सुमारे 65-70% ग्रामीण लोकसंख्या त्यांच्या जीवनमानासाठी शेती किंवा शेतीसंबंधित व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे पशुधन त्यांच्या उपजीविकेच्या आणि आर्थिक समृद्धीच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावते. या अतूट नात्याची जाणीव ठेवून आणि ग्रामीण कुटुंबांच्या जीवनात पशुधनाचे महत्त्व दृढ करत एसएमएफजी इंडिया क्रेडिटने “मेरा पशु मेरा परिवार” या संकल्पनेखाली 7व्या पशु विकास दिनाचे आयोजन केले.ग्रामीण कल्याणासाठी असलेल्या कंपनीच्या बांधिलकीला बळकटी देत या वार्षिक पीव्हीडी कार्यक्रमात 6,000 हून अधिक कर्मचाऱ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला.
एसएमएफजी इंडिया क्रेडिटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. शंतनू मित्रा म्हणाले, “एसएमएफजी इंडिया क्रेडिटमध्ये आम्ही समाजावर सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या सामाजिक उपक्रमांना पाठिंबा देण्याच्या आमच्या वचनबद्धतेवर ठाम आहोत. भारतभर आमच्या 1000 हून अधिक शाखांचे विस्तृत जाळे असून आमचा मुख्य भर टियर 2+ भागांवर आहे. आमच्या शाखांपैकी 90% शाखा याच भागांत स्थित आहेत. प्रत्यक्षात, गेल्या दोन वर्षांत आम्ही 300 नवीन शाखा सुरू केल्या, त्या सर्व टियर 2+ भौगोलिक क्षेत्रांमध्ये आहेत. आमचे ध्येय योग्य आर्थिक उत्पादने आणि उपायसुविधा पुरवून वित्तीय समावेशनाला चालना देणे असून त्यामुळे आम्ही प्रत्येक टप्प्यावर समुदायांची सेवा करू शकतो.
अत्यंत समर्पणाने आणि मेहनतीने विविध ठिकाणी मिळून सर्वात मोठे पशु कल्याण शिबिर आयोजित करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्यासाठी अहोरात्र मेहनत केलेल्या आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. या वर्षीचा पशु विकास दिन जनावरांसाठी केवळ सर्वोत्तम आरोग्यसेवा पुरविण्याच्या अपेक्षांपुरता मर्यादित नव्हता. तर भारतातील अनेक ठिकाणी विशेष ज्ञानसत्रे देखील आयोजित करण्यात आली. ही खरोखरच लक्षणीय गोष्ट होती. त्यामुळे आम्हाला हे प्रतिष्ठित गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाले.”
एसएमएफजी इंडिया क्रेडिटचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. स्वामिनाथन सुब्रमण्यम म्हणाले, “विविध ठिकाणी मिळून सर्वात मोठ्या पशु कल्याण शिबिरासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मान्यता मिळणे हा एसएमएफजी इंडिया क्रेडिटमधील प्रत्येकासाठी अभिमानास्पद आणि महत्त्वाचा क्षण आहे. एक कंपनी म्हणून, आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर इतिहासात आमचे नाव कोरले आहे. यामुळे आम्हाला आमच्या सेवा क्षेत्रातील समाजाच्या कल्याणासाठी नाविन्यपूर्ण आणि शाश्वत सामाजिक-आर्थिक उपक्रमांद्वारे कार्य करत राहण्याचा आत्मविश्वास मिळतो. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यातून ग्रामीण कल्याणाप्रती असलेल्या आमच्या समर्पणाची पुष्टी होते. आमच्या आर्थिक उपाययोजनांद्वारे त्यांच्या जीवनचक्रात आर्थिक सुविधा पुरवून समुदायांना सक्षम करण्यासाठी आम्हाला सतत प्रेरणा मिळते.” जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याच्या आपल्या समृद्ध परंपरेला पुढे नेत, एका दिवसात सर्वाधिक मोठ्या पशुकल्याण शिबिरांचे आयोजन केल्याबद्दल पशु विकास दिन याआधीही वर्ल्ड रेकॉर्डस यूनियन, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस, बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस आणि वर्ल्ड बुक्स ऑफ रेकॉर्डसने सन्मानित आहे.