no images were found
आलमट्टी उंचीप्रश्नी तीव्र विरोधाचा निर्धार: प्रसंगी दहा नोव्हेंबरला सांगली, कोल्हापूर बंद
सांगली : कर्नाटक मधील आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास कर्नाटक शासनाला विरोध करण्यासाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन उभारण्याचा निर्धार सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत झाला. येथील ‘कष्टकऱ्यांची दौलत’ कार्यालयातील बैठकीसाठी महापूर नियंत्रण समितीचे कार्यकर्ते, जलसंपदा विभागातील निवृत्त अधिकारी उपस्थित होते. शासनाने या प्रश्नी सकारात्मक कृती न केल्यास येत्या १० नोव्हेंबरला सांगली, कोल्हापूर जिल्हा बंद ठेवण्याचा निर्धारही करण्यात आला.
या वेळी केंगार म्हणाले, ‘‘आलमट्टी धरणाच्या फुगीमुळे सांगली-कोल्हापूरला महापुराचा धोका होतो, हे पुराव्यासह सिद्ध झाले आहे. यातील बारकावे व तांत्रिक माहिती सादर करताना हा अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे. भलेही ‘जलसंपदा’चे अधिकारी वेगवेगळे दावे करीत असले, तरी ते खासगीत वेगळीच माहिती देतात.
निवृत्त जलसंपदा अधिकारी विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, प्रमोद माने, उत्तमराव माने यांच्यासह माजी आमदार नितीन शिंदे, माजी नगरसेवक हणमंत पवार, नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर, रिपब्लिकन पक्षाचे किरणराज कांबळे, मराठा सेवा संघाचे संजय पाटील, भाजपच्या गटनेत्या भारती दिगडे, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवक ज्योती आदाटे, काँग्रेसचे नगरसेवक उत्तम साखळकर, वाहतूकदार संघटनेचे महेश पाटील, व्यापारी संघटनेचे समीर शहा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेश देशमुख आदी उपस्थित होते.