Home क्राईम माता नव्हे वैरीण  ! पाण्याच्या टाकीत टाकून घेतला चिमुकल्याचा जीव

माता नव्हे वैरीण  ! पाण्याच्या टाकीत टाकून घेतला चिमुकल्याचा जीव

2 second read
0
0
47

no images were found

माता नव्हे वैरीण  ! पाण्याच्या टाकीत टाकून घेतला चिमुकल्याचा जीव

टाकळघाट : येथील शिक्षक कॉलनीत भाड्याने राहणाऱ्या कुटुंबातील चिमुकल्याला त्याच्या जन्मदात्या आईनेच घरावरील पाण्याच्या टाकीत टाकून जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. चिमुकल्याचे नाव सारांश पंजाब पाटेकर असून त्याचे वय अवघे अकरा महिने इतके आहे. त्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी आई एकता पंजाब पाटेकर(वय२७)हिला अटक केली आहे .

टाकळघाट येथील मनोहर भेंडे यांच्याघरी पंजाब पाटेकर हे आपल्या कुटुंबासह गेल्या चारपाच महिन्यांपासून भाड्याने राहतात. चिमुकल्याचे वडील इंडोरामा कंपनीमध्ये कामाला आहेत. आई गृहिणी आहे. तीन वर्षापूवी  त्यांचा प्रेमविवाह झाला होता. त्या पती-पत्नीमध्ये वाद व्हायचा, तसेच परिस्थिती नाजूक असल्याने खर्च वाढत होता. नेहमीप्रमाणे तिने चिमुकल्याला पाळण्यामध्ये झोपवून घरची धुणी-भांडी करीत होती. त्याचवेळी चिमुकल्याचे वडील बेडवर झोपून होते.

धुणी-भांडी आटोपून खोलीमध्ये येऊन बघताच चिमुकला पाळण्यात न दिसल्याने तिने आरडाओरड केली. त्याच्या वडिलाला झोपेतून उठवून आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने शोध घेतला. दुसऱ्या माळावर असलेल्या पाण्याच्या टॅंकमध्ये चिमुकला दिसून आल्याने खळबळ उडाली. चिमुकल्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेताच डॉक्टरांनी रेफर केले. त्यानंतर खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा गायकवाड, पोलिस निरीक्षक अशोक कोळी, इकबाल शेख, प्रफुल राठोड आदींनी तपासाची चक्र फिरवीत चिमुकल्याच्या आई-वडिलांना संशयित म्हणून ताब्यात घेवून खाकीचा दणका दाखविला. चिमुकल्याच्या आईनेच त्याला पाण्याच्या टॅंकमध्ये टाकल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

63 व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आज उद्घाटन

63 व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आज उद्घाटन   कोल्हापूर : स…