Home शासकीय १३ बळी घेणारा नरभक्षी वाघ अखेर सापळ्यात बंद

१३ बळी घेणारा नरभक्षी वाघ अखेर सापळ्यात बंद

0 second read
0
0
131

no images were found

१३ बळी घेणारा नरभक्षी वाघ अखेर सापळ्यात बंद

भंडारा : तब्बल १३ जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षी ‘सीटी १’ या वाघाने वाघाला सापळ्यात अडकवण्यात वनविभागाला अखेर यश आले आहे. मागील तीन महिन्यांपासून या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरु होते.

‘सीटी १’ या वाघाने १३ लोकांची शिकार केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरीक दहशतीखाली वावरत होते. दोन दिवसांपूर्वी देसाईगंज जवळच्या एका गाईवर या वाघाने हल्ला केला. त्यामुळे तेथेच वनविभागाची टीम पाळत ठेवून होती.

गुरुवारी सकाळी ताडोबा येथील टीमने या वाघाला सापळ्यात अडकवला. त्याच्यावर बेशुद्धीचं इंजेक्शन डागण्यात आलं. १३ जणांचा बळी घेतल्यानंतर हा वाघ पकडण्यात आला आहे. त्यामुळे  परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. या वाघाला गडचिरोली जिल्ह्यातल्या वडसा येथे जेरबंद करण्यात आलेलं आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हा

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हापूरचा संकल्प; शहरात लावणार दहा हजार झाडे कोल्हापूर, (प्र…