Home राजकीय सच्चा शिवसैनिक खोटी कागदपत्रे देणार नाही : संजय मंडलिक

सच्चा शिवसैनिक खोटी कागदपत्रे देणार नाही : संजय मंडलिक

2 second read
0
0
105

no images were found

सच्चा शिवसैनिक खोटी कागदपत्रे देणार नाही : संजय मंडलिक
कोल्हापूर : सच्चा शिवसैनिक कधीही खोटी कागदपत्रे सादर करणार नाही. खोटी कागदपत्रे सादर करणे हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचे माझ्यासारख्या शिवसैनिकाला वाटते. ज्यांनी आपल्याला समर्थन मिळत नाही, म्हणून जर का भाडोत्री लोकांची प्रतिज्ञापत्र दिली असतील, तर त्याचा तपास तपास यंत्रणा करेल, असे प्रतिपादन शिंदे गटातील खासदार संजय मंडलिक म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ‘‘ढाल-तलवार शौर्याचे प्रतीक आहे. सर्वसामान्य शिवसैनिकांचे ढालीने रक्षण करणे आणि जे खोटे वार होताहेत, ‘गद्दार-गद्दार’ म्हणून हिणवले जात आहे. त्याविरोधात ही तलवार चालविणे, यासाठी प्रतीक म्हणून ढाल-तलवार आहे. चिन्हाबाबातचा पूर्ण निकाल होईल, त्यावेळी धनुष्यबाण हेच चिन्ह आम्हाला मिळेल, अशी खात्री आहे.’’
बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे हे बाळासाहेब नेमके कोण, असा सवाल करणाऱ्यांची बुद्धी भ्रमिष्ट झाली असून, शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची हे जगजाहीर असतानाही हा गैरसमज पसरविणाऱ्यांनी आत्म चिंतन करावे.’’ ज्या जिल्ह्यात नव्या सरकारविरोधात आंदोलन झालेले आहे, त्या जिल्ह्यात शिवसेनेच्या प्रतिज्ञापत्रांची चौकशी सुरू आहे. आजची कारवाई हा त्याचाच एक भाग आहे, पण जिल्ह्यातील शिवसैनिकाकडून दाखल झालेली प्रतिज्ञापत्रे ही खरी आहेत.’’

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…