Home शासकीय बेटी बचाओ, बेटी पढाओ’ दशकपूर्तीनिमित्त जनजागृती अभियानास सुरुवात

बेटी बचाओ, बेटी पढाओ’ दशकपूर्तीनिमित्त जनजागृती अभियानास सुरुवात

6 second read
0
0
13

no images were found

बेटी बचाओ, बेटी पढाओ’ दशकपूर्तीनिमित्त जनजागृती अभियानास सुरुवात

 

 

कोल्हापूर, : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या उपक्रमास दहा वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे जिल्हा महिला व बाल विकास विभाग मार्फत स्वाक्षरी अभियानाची सुरुवात व सेल्फी पाईंटचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लावण्यात आलेल्या फलकावर जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी स्वाक्षरी करुन अभियानाची सुरुवात केली. तसेच सेल्फी पॉईंटवर उपस्थित राहून छायाचित्र काढले. यावेळी महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा संरक्षण अधिकारी आलोक देवीप्रसादजी अग्रहरी यांच्यासह चाईल्ड हेल्पलाईन, वनस्टॉप सेंटर, जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

       ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त 8 मार्च पर्यंत चालणाऱ्या मोहिमे अंतर्गत विविध प्रचार, प्रसिध्दी कार्यक्रम, महिलांप्रती पुरुषांमध्ये संवेदनशीलता वाढविणे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013, बालविवाह प्रतिबंधक कायदा, न्याय संहिता व अन्य कायदे-योजनाबाबत प्रचार, प्रसिध्दी अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मध्ये महिलांची संस्थात्मक प्रसूती संख्या वाढविण्यासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी नोंदी वाढविण्यासाठी, प्रति हजार पुरुषांमागील महिलांचे असलेले लिंग गुणोत्तर वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न झाले. महिलांना प्रत्येक क्षेत्रात मुख्यप्रवाहात आणण्यासाठीची पावले या योजनेतून उचलण्यात आली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डी. वाय पाटील कृषी विद्यापीठाच्या 13 विद्यार्थ्यांची डी – मार्टमध्ये निवड

डी. वाय पाटील कृषी विद्यापीठाच्या 13 विद्यार्थ्यांची डी – मार्टमध्ये निवड   तळस…