Home शासकीय सोशल मीडिया पोस्टवरील अफवांवर विश्वास ठेवू नये

सोशल मीडिया पोस्टवरील अफवांवर विश्वास ठेवू नये

10 second read
0
0
14

no images were found

सोशल मीडिया पोस्टवरील अफवांवर विश्वास ठेवू नये

कोल्हापूर (प्रतिनिधी):- सद्या सोशल मिडीयावर विशेष सूचना कोल्हापूर शहर पाणी पुरवठा विभागाकडील फिल्टर बेड / मशिनरीमध्ये बिघाड झालेने येत्या दोन – तीन दिवसामध्ये पुर्ववत होणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेकडून पाणी फिल्टर न करता सोडणेत येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून प्यावे. कृपया ही माहिती आपल्या सर्व मित्र परिवाराल कळवावी आणि आपण पण काळजी घ्यावी असे मॅसेजेस व्हायरल होत आहेत.       

         तरी महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागाकडून संपूर्ण शहर व सलग्नित उपनगरांना पुईखडी, बावडा, बालिंगा व कळंबा जलशुध्दीकरण केंद्राकडून नदीमधून उपसा केलेल्या पाण्यावर ब्लिचिंग व क्लोरिनव्दारे प्रक्रिया करून निर्जंतुकीकरण केले जाते. तसेच सदरचे पाणी पिण्या योग्य असलेचे जिल्हा आरोग्य शाळेकडून दैनंदिन तपासणी करूनच पिण्यास योग्य असे शुध्द पाणी वितरीत केले जाते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडील फिल्टर मशिनरीमध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झालेला नसून सर्व जलशुध्दीकरण केंद्राकडील यंत्रणा 24 तास कार्यरत असून जलशुध्दीकरण केंद्राचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू आहे. तरी सद्या सोशल मिडीयावरील मॅसेज पूर्णपणे चुकीचा व दिशाभूल करणारा असून नागरीकांनी अशा प्रकारच्या मॅसेजेस व अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

Load More Related Articles

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…