Home Uncategorized सोनी सबच्या ‘बादल पे पांव है’ मालिकेत रजतच्या आयुष्यात लावण्या परत आल्याने रजत व बानीच्या नात्यात कटवटपणा..

सोनी सबच्या ‘बादल पे पांव है’ मालिकेत रजतच्या आयुष्यात लावण्या परत आल्याने रजत व बानीच्या नात्यात कटवटपणा..

2 second read
0
0
28

no images were found

सोनी सबच्या ‘बादल पे पांव है’ मालिकेत रजतच्या आयुष्यात लावण्या परत आल्याने रजत व बानीच्या नात्यात कटवटपणा..

 

सोनी सबवरील ‘बादल पे पांव है’ मालिका बानी (अमनदीप सिद्धू)च्या जीवनप्रवासावर आधारीत आहे. बानी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि दृढनिश्चयी मुलगी असून ती स्वत:सोबतच कुटुंबाचा जीवनसत्र सुधारण्यासाठी मोठी स्वप्न पाहत आहे. मात्र तिची स्वप्न पूर्ण होण्याएवढी आर्थिक परिस्थिती फार चांगली नसते. नुकत्याच झालेल्या भागात बानीला रजत (आकाश आहूजा) आणि लावण्या (भाविका चौधरी) या दोघांमधल्या नात्याची माहिती होते. त्यामुळे ती नाराज होते. ही फसवणूक असल्याचे तिला वाटते. रजतसाठी हे सगळं समजून घेताचा संघर्ष करावा लागतो. मात्र या नवविवाहित जोडप्यादरम्यान भावनिक दुरावा वाढतो. त्यांच्यातील नव्या प्रेमाची ही परीक्षा असते.

पुढील भागात रचतच्या जीवनात लावण्या पुन्हा आल्यामुळे बानीसोबतचे त्याचे नाते संपुष्टात येण्याची भीती निर्माण होते. रजत आणि लावण्याच्या पूर्वायुष्याबद्दल कळाल्याने दु:खी झालेल्या बानीला आणखी चढ-उतारांचा सामना करावा लागतो. कारण लावण्या परत आल्याचे रजत तिच्यापासून लपवतो. लावण्यासोबत ब्रेक अप झाल्यानंतर रजतने लगेच बानीसोबत लग्न केल्यामुळे आता लावण्या त्याला पुन्हा मिळवण्याचा निश्चय करते. लावण्या आल्याने मोठा अडथळा निर्माण होतो. कारण रजत आणि बानीदरम्याचं अंतर वाढण्याचा ती पूर्ण प्रयत्न करते. या दोघांचं नातं बिघडवण्यात लावण्या यशस्वी होते का? की या संकटातून रजत आणि बानीचे नाते अधिक मजबुतीने उभे राहते.. यातला ड्रामा पाहताना प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन होईल.

रजतच्या एक्स-गर्लफ्रेंड ची भूमिका करणारी भाविका चौधरी म्हणते, ” माझे पात्र लावण्या परत आल्यामुळे मालिकेला नवे वळण मिळेल आणि रजतसाठी तिच्या मनातल्या भावना पुन्हा जागृत होतील. लावण्याने रजतचे प्रेम मिळवण्यासाठी दृढ संकल्प केला आहे. घाईघाईत त्याला सोडण्याचा निर्णय घेतल्याचा तिला पश्चातापही होत आहे. रजत एवढ्या लवकर पुढे निघून जाईल, असा विचार तिने केला नव्हता. लावण्या समोरून चांगली दिसत असले मात्र पडद्यामागे ती डाव रचत आहे. तिचे इरादे एखादा कट रचल्यासारखे आहेत. रजतला तिचे हेतू ओळखता येतील का? या तिघांमधलं नाट्य कशा पद्धतीने समोर येईल, हे पाहणं रंजक ठरेल. “

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्र देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाच दिवस बंद छत्रपती शिव…