no images were found
झी टीव्हीवरील पुढील मालिका ‘वसुंधरा’: जेव्हा निरागसतेची भेट होते शिस्तीसोबत
दोन संपूर्णपणे वेगळ्या विचारांच्या स्त्रिया एकमेकांसमोर येत असताना प्रेक्षकांना पाहायला मिळेल विचारधारा आणि सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमींमधील संघर्ष
झी टीव्ही आपली लक्षवेधी नवीन मालिका वसुंधराच्या सुरूवातीसाठी सज्ज असून विभिन्न सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या दोन अतिशय वेगळ्या विचारांच्या व्यक्तिरेखा जेव्हा एकमेकांसमोर अगदी अनपेक्षितपणे येऊन ठाकतात तेव्हा काय होते याचा शोध ह्या मालिकेतून घेतला जाईल. आणि आम्ही इथे परस्परविरोधी म्हणून एखाद्या साधारण प्रेमकथेप्रमाणे एक मुलगा आणि एक मुलगी यांच्याबद्दल बोलत नसून आग आणि पाणी असलेल्या दोन स्त्रियांबद्दल बोलत आहोत. जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन अगदी निराळा आहे. त्यांच्या आयुष्यातील अनुभव आणि त्यांचे जीवनात विचार करण्याचे आणि वागण्याचे पूर्णपणे भिन्न तरीके आहेत. अरविंद बब्बल प्रॉडक्शन्स निर्मित ‘वसुंधरा’ मध्ये हलकेफुलके क्षण, भावनिक खोली आणि विचारधारा व स्वभावांचा तीव्र संघर्ष पाहायला मिळेल.
जपून पावले टाका कारण तुम्ही प्रवेश करत आहेत अतिशय आदरणीय आणि ज्यांना सगळे घाबरून असतात अशा चंद्रिका सिंग चौहान यांच्या साम्राज्यामध्ये. त्यांची भूमिका गुणी अभिनेत्री नौशिन अली सरदार साकारत आहेत. उदयपुर स्थित चंद्रिका ह्यांनी स्वतःच्या बळावर आपली ताकद निर्माण केली असून स्वतः निर्माण केलेल्या नियमावलीनुसारच त्या वागतात. त्यांचे हृदय सोन्याचे असून जे योग्य आहे त्याच्याच बाजूने त्या उभ्या राहतात. काहीशा हुकूमशहा असलेल्या चंद्रिका यांना असमंजसपणे वागलेले चालत नाही आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या सर्वांनी त्यांच्या शिस्त आणि सचोटीच्या कडक नियमांनुसारच राहिले पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांच्या मते ह्याच गोष्टी यशाची गुरूकिल्ली आहेत. दुसऱ्यांना अक्षरशः घाबरायला होईल अशा कडक शिस्तीच्या चंद्रिका अनेकदा भावनांच्या जागी नियम आणि नैतिकता यांनाच प्राथमिकता देतात. तर दुसऱ्या बाजूला गुणी अभिनेत्री प्रिया ठाकूर ह्या मालिकेत वसुंधराची मुख्य भूमिका साकारताना दिसून येईल. वसुंधरा एक निरागस मुलगी असून तिला शिस्तीच्या आणि शहरी जीवनशैलीचा अनुभव नाही. ती जगाकडे आपल्या निरागस दृष्टीने पाहते आणि जशी ती चांगली आहे तसेच सगळेच लोक चांगले असतात असे तिला वाटते. चंद्रिका यांना ती देव मानते आणि त्यांना प्रभावित करण्याच्या नादात वसुंधरा चुकून एका संकटात सापडते.
नौशिन अली सरदार म्हणाल्या, “एवढ्या खास भूमिकेसोबत पुनरागमन करायला मिळत आहे यापेक्षा अधिक मी काय मागू शकले असते. चंद्रिका अतिशय शक्तीशाली, स्वतःच्या हिंमतीवर बनलेली स्त्री असून शिस्त आणि सचोटीच्या कडक नियमांनुसार जगते. एक अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी हे काहीतरी नवीन आणि रोमांचक असे आव्हानच आहे. मी साकारलेल्या सर्व व्यक्तिरेखांपैकी ही व्यक्तिरेखा सर्वाधिक जटिल आहे. ह्या मालिकेतील अन्य कलाकार आणि तंत्रज्ञांचे उत्तम समर्थन मला लाभत असून चित्रीकरणाच्या वेळची ऊर्जा अगदी प्रेरणादायक असते. आम्ही हल्लीच उदयपुरमधील मोठे आऊटडोअर चित्रीकरण पूर्ण केले आणि आता मुंबईमध्ये चित्रीकरणाला सुरूवात करणार आहोत. आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करत असलेली ही नाजूक नाती आणि हे ताकदीचे कथानक प्रेक्षकांनी पाहावे यासाठी मी खूप उत्सुक आहे.”
प्रिया ठाकूर म्हणाली, “मला माझ्या पदार्पणासाठी ह्यापेक्षा अधिक चांगला मंच आणि कथानक मिळूच शकले नसते. जीवनाकडे पाहण्याच्या निरागस दृष्टीकोनापासून शिस्तप्रिय शहरी जगाच्या गुंतागुंतीची ओळख होण्यापर्यंत वसुंधराचा प्रवास साकारणे अतिशय रोचक असेल. नौशिन मॅमसोबत काम करताना नक्कीच नवीन काही शिकता येईल. चित्रीकरणाचा प्रत्येक दिवस हा नवीन माहिती आणि एक अभिनेत्री म्हणून विकसित होण्याच्या संधी घेऊन येतो. मला आशा आहे की प्रेक्षक नक्कीच त्यांच्या प्रेमाचा वर्षाव आमच्यावर करतील.”
ह्या दोन्ही व्यक्तिरेखांमध्ये प्रचंड फरक असला तरी काय वसुंधरा चंद्रिकाला प्रभावित करू शकेल? काय त्या दोघी एकाच घरात राहू शकतील? त्यांच्या जगामध्ये जेव्हा संघर्ष होर्इल तेव्हा काय होर्इल? पहा ‘वसुंधरा’, ही मालिका वाहिनीच्या उत्तम कॉन्टेन्ट मिलाफामध्ये आणखी एक नवीन रंगत आणेल!