Home धार्मिक श्री.केदारलिंग (देव जोतिबा) मूळ मूर्तीची २१ ते २४ अखेर भारतीय पुरातत्व विभागाकडून संर्वधन प्रक्रिया

श्री.केदारलिंग (देव जोतिबा) मूळ मूर्तीची २१ ते २४ अखेर भारतीय पुरातत्व विभागाकडून संर्वधन प्रक्रिया

12 second read
0
0
35

no images were found

श्री.केदारलिंग (देव जोतिबा) मूळ मूर्तीची २१ ते २४ अखेर भारतीय पुरातत्व विभागाकडून संर्वधन प्रक्रिया

 

 

 

कोल्हापूर, : मौ.वाडी रत्नागिरी ता. पन्हाळा जि. कोल्हापूर येथील श्री. केदारलिंग (देव जोतिबा) देवस्थान मुळ मूर्ती सुस्थितीत राहणेच्या अनुषंगाने, जिल्हाधिकारी, कोल्हापूर तथा प्रशासक, देवस्थान व्यवस्थापन समिती, कोल्हापूर यांचे वतीने मूर्तीची पाहणी करणेकामी वेळोवेळी पुरातत्व विभाग यांना कळविण्यात आले होते. त्यानुसार भारतीय पुरातत्व विभाग, दिल्ली व पुरातत्व विभाग, पुणे यांचेकडून मूर्तीची पाहणी करणेत आली होती व मूर्ती संवर्धनाच्या अनुषंगाने अहवाल देण्यात आला होता.

       अहवालाच्या अनुषंगाने देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर यांचे वतीने मूर्तीचे रासायनिक संवर्धन प्रक्रिया करणेच्या अनुषंगाने महासंचालक, भारतीय पुरातत्व विभाग, दिल्ली यांना दि.०३/०१/२०२५ च्या पत्राने कळविले होते. त्यानुसार दि.१७/०१/२०२५ रोजी भारतीय पुरातत्व विभाग, दिल्ली यांचेकडील अधिकारी यांनी मूर्तीची पाहणी केली. पाहणीअंती भारतीय पुरातत्व विभाग, दिल्ली कडील अधिकारी व सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, पुणे यांनी देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर व गावकर प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून श्री. केदारलिंग (देव जोतिबा) देवस्थान मूर्तीची रासायनिक संर्वधन प्रक्रिया मंगळवार दि.२१/०१/२०२४ पासून शुक्रवार दि.२४/०१/२०२५ अखेर करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

       त्यामुळे श्री. केदारलिंग (देव जोतिबा) देवाची मूळ मूर्तीचे मंगळवार दि. २१/०१/२०२५ पासून शुक्रवार दि. २४/०१/२०२५ अखेर दर्शन भाविकांना घेता येणार नाही, यास्तव भाविकांना सदर कालावधीमध्ये उत्सवमूर्ती व कलश दर्शनासाठी मंदिरातील कासव चौक येथे ठेवणेत येणार असून, भाविकांनी याकालावधीत कलश व उत्सवमूर्तीचे दर्शन घेऊन, देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर व समस्त पुजारी वर्ग यांना सहकार्य करावे, अशी विनंती  देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…