
no images were found
सावित्रीबाई फुले रुग्णालयातील मॅटर्निटी ऑपरेशन थिएटर व लेबररुम र्निजंतूकीकरणासाठी पाच दिवस बंद
कोल्हापूर (प्रतिनिधी):- महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील मॅटर्निटी ऑपरेशन थिएटर व लेबररूम येथे र्निजंतूकीकरणाचे काम करण्यात येणार आहे. हे काम शुक्रवार दि.10 ते 14 जानेवारी 2025 पर्यंत पाच दिवस करण्यात येणार आहे. या कालावधीत हा विभाग बंद राहणार आहे. बुधवार दि.15 जानेवारी रोजी स्वॅब रिपोर्ट आल्यावर हॉस्पीटलकडील कामकाज सुरु होणार आहे. तरी या पाच दिवसाच्या कालावधीत संबंधीत नागरीकांनी महापालिकेच्या पंचगंगा रुग्णालय व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे जावे असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.