Home सामाजिक डॉ .पद्मा रेखा जिरगे यांची फर्टिलिटी प्रिझर्वेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड 

डॉ .पद्मा रेखा जिरगे यांची फर्टिलिटी प्रिझर्वेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड 

26 second read
0
0
14

no images were found

डॉ .पद्मा रेखा जिरगे यांची फर्टिलिटी प्रिझर्वेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड 

कोल्हापूर, (प्रतिनिधी):- उजळाईवाडी येथील श्रेयस मल्टी स्पेशालिटी  हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट व सुश्रुत आयव्हीएफ क्लिनिकच्या संस्थापिका  व संचालिका डॉ .पद्मा रेखा जिरगे यांची फर्टिलिटी प्रिझर्वेशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेवर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांची या पदावर झालेली निवड कोल्हापूर साठी भूषणीय आहे. 

         बेंगलोर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली. डॉ. पद्मा रेखा जिरगे यांनी यापूर्वी  या सोसायटीच्या ऑनररी सेक्रेटरी तसेच व्हाईस प्रेसिडेंट या पदांवर काम केले आहे. 2014 मध्ये प्रजनन तंत्राद्वारे कर्करोग पीडित रुग्णांच्या पुनरुत्पादक समस्यांचे निराकरण करण्यासाठी या सोसायटीची स्थापना करण्यात आली होती.  प्रजनन क्षमता संरक्षण प्रक्रिया अंतर्गत स्त्री बीजांड गोठवणे, शुक्राणू बँकिंग, भ्रूण फ्रिजिंग आणि गर्भाशयमुख व गर्भाशयाच्या कर्करोगासाठी विशिष्ट प्रकारच्या शस्त्रक्रिया यांचा समावेश होतो. या सोसायटीची व्यापकता केवळ भारतातच नव्हे तर सर्व आशियायी देश आणि जगभरात पसरली आहे.

         डॉक्टर जिरगे या पुढील दोन वर्ष या पदाचा कार्यभार सांभाळतील. आपल्या कार्यकालादरम्यान या संस्थेअंतर्गत असणाऱ्या सेवा पोहचविण्यात जे  अडथळे येतात ते दूर करण्यासाठी त्या विशेष प्रयत्नशील असतील. लहान वयात उद्भवणाऱ्या कॅन्सरमुळे व त्यावरील उपचारांमुळे पुढे वंध्यत्व निर्माण होऊ शकते. नवनवीन संशोधनामुळे  कॅन्सरवरील उपचारांमध्ये 80 टक्के होऊन जास्त लोकांवर यशस्वी उपचार साध्य झाले आहेत, परंतु त्यानंतर होणाऱ्या वंध्यत्वासारख्या दुष्परिणांना टाळण्यासाठी व 

         कॅन्सरमधील ट्रीटमेंटमध्येदेखील काही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पुढील दोन वर्षात डॉ. जिरगे यांचे मार्गदर्शन उपयुक्त  राहील. या अवधीत आयव्हीएफ आणि कॅन्सर क्लिनिक्स स्टाफ यांचीही अभ्यासपूर्ण तयारी करून घेण्यात येईल. श्रेयस मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट आणि सुश्रुत आयवीएफ क्लिनिक , मागील पंधरा-सोळा वर्षांपासून फर्टिलिटी प्रिझर्वेशनसाठी काम करत असून कित्येक कॅन्सरपीडित रुग्णांवर  उपचार करून त्यांना अपत्यप्राप्ती करून देण्यात यशस्वी झाले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्र देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाच दिवस बंद छत्रपती शिव…