Home मनोरंजन ‘द सिक्रेट ऑफ द शिलेदार’ ३१ जानेवारी पासून फक्‍त डिस्नी+ हॉटस्‍टारवर 

‘द सिक्रेट ऑफ द शिलेदार’ ३१ जानेवारी पासून फक्‍त डिस्नी+ हॉटस्‍टारवर 

1 min read
0
0
11

no images were found

‘द सिक्रेट ऑफ द शिलेदार’ ३१ जानेवारी पासून फक्‍त डिस्नी+ हॉटस्‍टारवर 

मुंबई,: शौर्य, निष्‍ठा आणि कर्तव्‍याप्रती अविरत समर्पिततेची गाथा. डिस्नी+ हॉटस्‍टार अद्वितीय खजिना शोध-आधारित सिरीज ‘द सिक्रेट ऑफ शिलेदार’ घेऊन येत आहे. ही सिरीज दिग्‍गज संरक्षक व विश्‍वसनीय कारभारी ‘शिलेदार’च्‍या गाथेला सादर करते, ज्‍यांच्‍या अविरत समर्पिततेने युगाला आकार दिला. दशमी क्रिएशन्‍स एलएलपी बॅनरअंतर्गत चित्रपट ‘मुंजा’मधून प्रसिद्धी मिळालेले आदित्‍य सरपोतदार यांचे दिग्‍दर्शन आणि नितीन वैद्य निर्मित या सिरीजमध्‍ये राजीव खंडेलवालसह सई ताम्‍हणकर, गौरव अमलानी आणि आशिष विद्यार्थी प्रमुख भूमिकेत आहेत. ही सिरीज ३१ जानेवारी २०२५ पासून फक्‍त डिस्नी+ हॉटस्‍टारवर पाहता येईल.     

या सिरीजचे दिग्‍दर्शक आदित्य सरपोतदार म्‍हणाले, ”लहानाचा मोठा होत असताना माझे नेहमी साहसी व ऐतिहासिक कथांनी लक्ष वेधून घेतले आहे, माझ्या मनात अशा कथांबाबत नेहमी उत्‍सुकता असायची. अशाच उत्‍सुकतेमधून ‘द सिक्रेट ऑफ द शिलेदार’ची निर्मिती झाली आहे. संरक्षक असलेल्या ‘शिलेदार’ची संकल्‍पना यापूर्वी सादर करण्‍यात आलेली नाही, ज्‍यामुळे ही सिरीज रोचक असणार आहे. माझा विश्‍वास आहे की, ‘द सिक्रेट ऑफ द शिलेदार’ प्रोजेक्टने मला आव्‍हान दिले आहे आणि माझ्या कम्‍फर्ट झोनमधून बाहेर पडण्‍यास प्रवृत्त केले आहे. मला राजीव खंडेलवालसोबत हा प्रवास सुरू करण्‍याचा आनंद होत आहे. त्‍याने या सिरीजसाठी स्‍वत:चे तन-मन झोकून दिले आहे. मला खात्री आहे की, पडद्यावर ती मेहनत दिसून येईल. डिस्नी+ हॉटस्‍टारवर प्रेक्षकांचे प्रेम व पाठिंबा मिळण्‍याची मी आशा करतो.” 

अभिनेता राजीव खंडेलवाल म्‍हणाले, ”माझा विश्‍वास आहे की, इतर कोणी नाही तर ‘द सिक्रेट ऑफ द शिलेदार’ने मला निवडले. अशी वेगळी व बहुआयामी भूमिका साकारण्‍याबाबत माझ्या मनात शंका होती, पण आदित्‍य यांनी त्‍यांच्या सूक्ष्मदर्शी दृष्टिकोनासह सर्वकाही सोपे व सुरळीत केले. इतिहासाप्रती उत्‍सुकता असलेल्‍या बहुतांश व्‍यक्‍तींप्रमाणे मी देखील आदित्‍य यांनी पटकथेचे वर्णन केल्‍यानंतर भारावून गेलो आणि माझ्यामध्‍ये अशा धमाल व माहितीपूर्ण प्रकल्‍पामध्‍ये काम करण्‍याची उत्‍सुकता जागृत झाली. मी प्रेक्षकांना या आनंदमय राइडवर घेऊन जाण्‍यास आणि डिस्नी+ हॉटस्‍टारवर त्‍यांची प्रतिक्रिया पाहण्‍यासाठी अत्यंत उत्सुक आहे.” 

अभिनेत्री सई ताम्‍हणकर म्‍हणाल्‍या, ”मला मराठ्यांची गाथा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सादर करणाऱ्या कथानकाचा भाग असण्‍याचा आनंद होत आहे. मी बालपणापासून अनेक कथा ऐकत आले आहे आणि प्रत्‍येक वेळी प्रत्‍येक कथा ऐकून मला अभिमान वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा फक्‍त महाराष्‍ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रख्‍यात आहे आणि याच कारणामुळे माझी या प्रकल्‍पाचा भाग असण्‍याची इच्‍छा होती. मी ही संधी देण्‍यासाठी डिस्नी+ हॉटस्‍टारचे मनापासून आभार व्‍यक्‍त करते आणि ही सिरीज प्रदर्शित होण्‍यास अत्यंत उत्‍सुक आहे.”

Load More Related Articles

Check Also

विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा – मीना शेंडकर -डी. वाय. पाटील विद्यानिकेतन येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात 

विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा – मीना शेंडकर -डी. वाय. पाटील विद्यानिके…