Home शैक्षणिक विज्ञानाने मानवी जीवन सुसह्य व्हावे एकनाथ आंबोकर 52 वे शहर स्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न

विज्ञानाने मानवी जीवन सुसह्य व्हावे एकनाथ आंबोकर 52 वे शहर स्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न

18 second read
0
0
41

no images were found

विज्ञानाने मानवी जीवन सुसह्य व्हावे एकनाथ आंबोकर 52 वे शहर स्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न

या प्रदर्शनात 254 वैज्ञानिक उपकरणांचा सहभाग

कोल्हापूर (प्रतिनिधी):- कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती व जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 52 वे शहर स्तरीय विज्ञान प्रदर्शन राणासामानी या शाळेमध्ये संपन्न झाले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा विज्ञानाचे महत्त्व वाढावे तसेच त्यांच्यातील सुप्त गुणांना चालना मिळावी या दृष्टिकोनातून दरवर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. हे प्रदर्शन दि.26 व 27 डिसेंबर 2024 अखेर होते.

         या प्रदर्शनात आज भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे दोन मिनिटे स्तब्धता पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून सायंकाळी बक्षीस समारंभ घेण्यात आला. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील मुख्य लेखा व वित्त लेखा अधिकारी अतुल आकुर्डे तसेच मुख्याध्यापक संघाचे सचिव आर वाय पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी विज्ञानाचे महत्त्व विशद करून मानवी जीवनाच्या उपयोगासाठी विज्ञानाचा वापर व्हावा असे मत व्यक्त केले. हे प्रदर्शन प्रशासनाधिकारी आर व्ही कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे यांनी या प्रदर्शनाची आयोजन केले.

         या प्रदर्शनात शहरातील शाळांनी 254 वैज्ञानिक उपकरणे बनवून सहभाग घेतला. यामध्ये विविध विषयांच्या अनुषंगाने वैज्ञानिक उपकरणांची मांडणी करण्यात आली होती. सदर उपकरणाची परीक्षा करण्याकरिता परीक्षक नेमण्यात आले होते. या परिक्षणामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय आलेले विद्यार्थी व शाळांना बक्षिसे देण्यात आली. यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी गट प्रथम क्रमांक तेजस मुक्त विद्यालयाचा विराज दिलीप वाघ, द्वितीय क्रमांक समित्र विद्यालयाचा भूपेंद्रसिंह सरनोबत, तृतीय क्रमांक रा.णा.सामानी विद्यालयाची अधिरा साळस्कर, उच्च प्राथमिक गट प्रथम क्रमांक मनपा बोंद्रेनगर विद्यालय श्रेया वालकोळी,  द्वितीय क्रमांक मनपा न्युपॅलेस स्कुल विठ्ठल राठोड तृतीय क्रमांक, गोखले विद्यालयाची अक्षरा गाडीवदर, माध्यमिक विभाग प्रथम क्रमांक फुलेवाडी छत्रपती शाहू महाराज हायस्कूलचा स्वरूप पाटील, द्वितीय क्रमांक राजर्षी छ.शाहू महाराज हायस्कुल साईराज विनायक प्रभावळे, तृतीय क्रमांक प्रायव्हेट हायस्कूलच्या शुभम वांयगणकर,  कोल्हापूर उच्च प्राथमिक गट प्रथम क्रमांक आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलचा हर्ष चौगुले, द्वितीय क्रमांक शाकृपंत वालावलकर हायस्कूलच्या समर्थ कराडे, तृतीय क्रमांक मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूलच्या अरमान मोमीन यांनी पटकाविला. याबरोबरच शिक्षक गटातून सुद्धा काही उपकरणे प्राप्त झाली होती त्यामधील प्रथम क्रमांक शिवाजी विद्यालयाच्या अनुराधा वातकर, माध्यमिक शिक्षक गटातील महाराष्ट्र हायस्कूलच्या अमृता कळंत्रे, प्रयोगशाळा सहाय्यक परिचर गट आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या राहुल चोपडे, दिव्यांग विद्यार्थी गट प्रथम क्रमांक आदर्श प्रशालेच्या स्वरित मिठारी, गर्ल्स हायस्कूलच्या स्वरूपा राऊत यांनी पटकाविला. या विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन त्यांच्या शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

         याप्रसंगी कार्यक्रमाधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, उषा सरदेसाई विलास पवार, मुख्याध्यापक दस्तगीर मुजावर, श्रावण कोकितकर, शांताराम सुतार व सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी  मोठया संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…