
no images were found
यादीतील ग्रामीण मतदारांची समाविष्ट नावे त्वरित रद्द करा : भाजपाचे निवेदन
कोल्हापूर : सध्या शासन स्तरावर कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती यांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. त्या अनुषंगाने मतदार पडताळणी व हरकती प्रकिया सुरु आहे. पंरतु या सुरु आसलेल्या मतदान पडताळणी प्रक्रियेमध्ये अनेक त्रुटी समोर येत आहेत. कोल्हापूर महापालिका पंचवार्षिक निवडणूक २०२२ साठी तयार केलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये शिंगणापूर (कोल्हापूर ग्रामीण) येथील ४६५ नावे कोल्हापूर शहराच्या मतदार यादीत समाविष्ट झाल्याचे भाजपा माजी नगरसेवकांनी दाखवून दिले आहे.
या सुरु असलेल्या मतदान पडताळणी प्रक्रियेमधील अशा गंभीर त्रुटी शासन स्तरावर दुरुस्त होणेसाठी आज भारतीय जनता पार्टीच्यावतीने भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री चंद्रकांत घाटगे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी कोल्हापूर, आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांना ईमेलद्वारे निवेदन सादर केले. यामध्ये प्रामुख्याने महापालिका एकूण मतदार ४,६१,८९२ मधील असे किती मतदार ग्रामीण मधून समविष्ट झाले आहेत याची सखोल पडताळणी आणि चौकशी व्हावी, कोल्हापूर महापालिका हद्दी लगतचे ग्रामीण मतदारांची नावे ऑनलाईन/ ऑफलाईन शिफ्टिंग करून काही अधिकारी हा गैर व्यवहार करीत आहेत. ऑनलाईन नोंदणी/ शिफ्टिंग प्रक्रिया यावर नियंत्रण नसल्याचे दिसून येते. त्यासाठी आवश्यक यंत्रणा तातडीने कार्यरत करावी, मतदार यादीतील नावांची दुबार नोंदणी (ग्रामीण/शहरी) याची शहानिशा करून अशी नावे त्वरित महापालिका व जिल्हापरिषद निवडणुकीपूर्वी वगळणेत यावीत, तसेच वगळणेत आलेली नावे किमान एक वर्ष शिफ्टिंग होणार नाहीत असे आदेश निवडणूक विभाग व ऑनलाईन प्रक्रीये मध्ये बदल करणेबाबत विचार व्हावा. जेणे करून महापालिका व जिल्हापरिषद पंचवार्षिक निवडणुका ह्या जर सहा महिन्याच्या कालावधीमध्ये होत असतील तर शहरातील मतदार ग्रामीणला शिफ्ट होऊन दोन्ही कडे मतदान करून एखाद्या गरीब व होतकरू उमेदवारावर अन्याय करून संविधानाचा गैर वापर करतील. अशा मागण्यांचे सविस्तर निवेदन सदार करून या विषयात गांभीर्याने लक्ष देऊन शासन स्तरावर योग्य ते बदलाचे आदेश व्हावेत असे निवेदन सादर करण्यात आले आहे.