no images were found
विविध संस्थातील माहेरवासीची अंबाबाई – जोतिबा दर्शन सहली चे आयोजन कोल्हापूर/ जोतिबा – शिवज्ञा महिला बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था वाकरे संस्थांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील अनाथ, निराधार, मीराश्रीत स्वयंसेवी संस्थेतील माहेरवासी व त्यांच्या बालकांकरिता दिव्यांग व्यक्ती तृतीयपंथी व्यक्ती यांच्याकरिता एक दिवशीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा ,बेळगाव, सोलापूर आदी ठिकाणहुन मुली आल्या होत्या .पवन एजन्सी चे संस्थापक पवन पाटील यांनी दोन गाड्या उपलब्ध करून संस्थेस सहकार्य केले.
पाडळी खुर्द, देवाळे, गोकुळ शिरगाव, ग्रामपंचायत सरपंच यांनी या माहेरवासिनींना माहेरपणाची ओटी खण देऊन मुलींचा आदर सत्कार केला. योगेश सपाटे सांगरूळ हायस्कूलचे खाडे सर यांनी मुलींना सुखी संसारासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक अर्चना पाटील उपस्थित होत्या.त्यांनी सर्व माहेरवासी मुलींना करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घडवून दिले.
त्यानंतर सहल दख्खनचा राजा जोतिबा मंदिराकडे मंदिराच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आला. तिथेही कोडोली पोलीस ठाणे पोलीस प्रशासनाने या कार्याची दखल घेऊन सहकार्य केले.
या उपक्रमामुळे माहेरवासणी, मुले आनंदाने भारावून गेल्या होत्या .हेरले गावच्या पोलीस पाटील नयन पाटील यांच्या वतीने स्नेहभोजन दिले. सांस्कृतिक कार्यक्रम संस्थेच्या वतीने आयोजन करून उपक्रम संपन्न व यशस्वी रित्या पार पडला संस्थेच्या अध्यक्षा सौ. शुभांगी तानाजी चौगले यांना माहेरवासीण आपले लहानपणापासूनचे मनोगत व्यक्त करून संस्थेस व संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या आणि भविष्यात विविध उपक्रमातून हे स्नेहबंध अधि�