Home सामाजिक “फायझर इंडियाकडून गोवा राज्याच्या सहकार्याने लाँच एएमआर आणि संसर्गाचा सामना करण्यासाठी संयुक्त प्रयत्न”

“फायझर इंडियाकडून गोवा राज्याच्या सहकार्याने लाँच एएमआर आणि संसर्गाचा सामना करण्यासाठी संयुक्त प्रयत्न”

26 second read
0
0
28

no images were found

फायझर इंडियाकडून गोवा राज्याच्या सहकार्याने लाँच एएमआर आणि संसर्गाचा सामना करण्यासाठी संयुक्त प्रयत्न”

 

 

बांबोलिम – फायझर इंडिया, गोवा सरकार, गोवा सरकारी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, गोवा आरोग्य सेवा संचालनालय आणि अमेरिकेअर्स इंडिया फाऊंडेशन यांच्या सहकार्याने, परिवर्तन प्रकल्प सुरू करण्यात आला.

फायझरच्या सामाजिक उत्तरदायित्व कार्यक्रमाद्वारे समर्थित हा प्रकल्प गोवा राज्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये संक्रमण प्रतिबंध आणि नियंत्रण मजबूत करणे, जागतिक आरोग्य प्राधान्यांवरील भारताच्या राष्ट्रीय कृती योजना संरेखित करण्यात मोलाचे योगदान देणार आहे.

गोवा सरकारी मेडिकल कॉलेज आणि सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे आयोजित कार्यक्रमात गोवा सरकारचे आरोग्य मंत्री श्री. विश्वजित राणे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. गोवा सरकार, गोवा सरकारी मेडिकल कॉलेज, गोवा सार्वजनिक आरोग्य विभाग, अमेरिकेअर्स इंडिया फाऊंडेशन, आणि फायझर इंडिया यांच्यातील भागीदारी फायझरच्या सामाजिक उत्तरदायित्व कार्यक्रमाद्वारे समर्थित आहेत.

प्रकल्प परिवर्तनमधून अँटीमाइक्रोबियल रेझिस्टन्सच्या तातडीचे धोके निश्चित करून त्यावर काम केले जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार अँटीमाइक्रोबियल रेझिस्टन्सहे जगातिल सर्वात 10 धोक्यापैकी एक आहे. प्रतिरोधकांना न जुमानणाऱ्या जंतूंमुळे 2050 पर्यंत दरवर्षी 10 दशलक्ष मृत्यू होऊ शकतात, असा आरोग्य संघटनेचा अंदाज आहे. 2021 च्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अभ्यासात रक्तप्रवाहातील संसर्गामध्ये जीवाणू प्रतिरोधकाशी संबंधित मृत्यू दर 38.1% आणि मूत्रमार्गाच्या संसर्गामध्ये 27.9% नोंदवले गेले आहेत,. त्यामुळे या बाबतीत तातडीने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

यावेळी बोलताना श्री. विश्वजित राणे म्हणाले, “गोवा सरकार आणि आरोग्य मंत्रालय येणाऱ्या काळात रुग्णालयांमधील संक्रमणांवर आधारित धोरणे विकसित करण्यासाठी वचनबद्ध आहे. फायझरच्या योगदानांसह प्रकल्प परिवर्तन सुरक्षित आरोग्य सेवा पद्धती पुरवून टाळता येण्याजोगा मृत्यू आणि विकृती रोखण्यास मदत करेल.”

उपक्रमातील फायझरच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना फायझर इंडियाच्या व्यवस्थापकिय संचालक सुश्री मीनाक्षी नेवातिया म्हणाल्या, ,“प्रकल्प परिवर्तन आमच्या आरोग्य सेवा भागीदारांच्या सहकार्याने प्रतिजैविक प्रतिकारासारख्या गंभीर आरोग्य आव्हानांचा सामना करण्यासाठी फायझरची दृढ वचनबद्धता दर्शवते. सोबतच संक्रमण प्रतिबंध आणि नियंत्रणामध्ये गोवा सरकारला कौशल्य, संसाधने आणि सामायिक दृष्टी प्रदान करीत हा प्रकल्प सार्वजनिक आरोग्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी चालना देई. प्रतिजैविकांना न जुमानणाऱ्या जंतूंच्या विरोधात लढणारा हा प्रकल्प संपूर्ण भारतातील आरोग्य सेवा संस्थांसाठी मोलाचे योगदान देऊन सर्वांसाठी चांगले आरोग्य परिणाम देण्यासाठी ब्लू प्रिंट म्हणून काम करेल, अशी आम्हाला आशा आहे.”

या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून राबविणार प्रकल्प (कालावधी नोव्हेंबर 2024 ते एप्रिल 2028)

  • संसर्ग प्रतिबंध नियंत्रण कार्यक्रमासाठी राज्यव्यापी फ्रेमवर्क विकसित करणे.
  • आरोग्यसेवा-संबंधित संक्रमण कमी करणे आणि प्रतिजैविकांचा वापर अनुकूल करणे.
  • बेसलाइन मूल्यांकन ठरविणे,त्यावर देखरेख ठेवणे, साधने तयार करणे आणि विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे.
  • सुरक्षित आरोग्यसेवा वातावरणास प्रोत्साहन देण्यासाठी आणि तर्कशुद्ध प्रतिजैविक वापरास प्रोत्साहन देण्यासाठी वैद्यकीय संघांची क्षमता मजबूत करणे.

टप्प्याटप्प्याने राज्यभरातील सर्व 36 सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये विस्तारित करण्याच्या योजनांसह हा कार्यक्रम सुरुवातीला गोवा सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि दोन जिल्हा रुग्णालयांमध्ये प्रकल्प राबविण्यात येईल.

या सहकार्यावर भाष्य करताना, गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे अधिष्ठाता, डॉ. एस.एम. बांदेकर म्हणाले, “गोव्याच्या प्रतिजैविक जंतू नियंत्रण कृती योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून, गोवा सरकारी वैद्यकीय महाविद्यालये या आव्हानाचा सामना करण्यासाठी वचनबद्ध आहे. आरोग्य सेवा क्षेत्रात सेवा देणाऱ्यांनी या प्रकल्प परिवर्तनमध्ये सामील होऊन आणि रुग्णांना चांगले परिणाम देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मी करतो.

अमेरिकेअर्स इंडिया फाऊंडेशनचे कंट्री डायरेक्टर श्री. व्ही.एस. चंद्रशेखर म्हणाले, “परिवर्तन प्रकल्प शाश्वत आरोग्य सेवेसाठी वचनबद्धतेला बळकटी देतो. पायाभूत सुविधा, उपकरणे आणि कौशल्यांमधील गंभीर उणीव दूर करण्यासाठी आरोग्य सेवा संचालनालयाने दिलेल्या सहकार्याबद्दव आम्ही कृतज्ञ आहोत. गेल्या काही वर्षांत, अमेरिकेअर्स इंडियाने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य क्षमता मजबूत करून , राष्ट्रीय गुणवत्ता मानके पूर्ण करण्यासाठी राज्यातील 25 पैकी 19 प्राथमिक आरोग्य केंद्रांना मदत केली आहे.”

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

इलेट्रिक बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनच्या कामाचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून आढावा, 

  इलेट्रिक बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनच्या कामाचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून आढा…